भारताची सर्वात प्राचीन भाषा ही पालि भाषा आहे. ही भाषा प्राचीन काळी, सर्व भारतीयांना येत होती आणि त्याचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे सम्राट अशोक यांचे शिलालेख हे पालि – प्राकृत भाषेमध्ये भारतभर लिहिलेले आहेत. हीच पालि भाषा भ.बुद्धांच्या काळी सर्वसामान्यांची भाषा होती आणि म्हणूनच बुद्धांनी देखील पालि भाषेतच देशना दिली होती.
पालि भाषेला पुन्हा एकदा “लोकप्रिय” भाषा बनविण्यासाठी बौद्ध साहित्य प्रसारक मंडळाने 10 वर्षांपूर्वी पालि भाषेचे वर्ग नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पालि विभागाच्या मार्फत सुरू केले. आजपर्यंत 500 जण आमच्या वर्गांमधून पालि भाषे शिकले असून अनेकांनी पुढे MA, MPhil, PhD देखील केले आहे.
पालि भाषेला पुन्हा एकदा जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी घेतलेल्या कष्टांचे संस्थेला सार्थ अभिमान आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा काळात, शासनाच्या नियमानुसार सर्व वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. याही वर्षी पालि भाषेचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेत आहोत.
संस्थेच्या पालि भाषा वर्गात, पालि व्याकरण, त्रिपिटकातील काही निवडक सुत्तांचा अभ्यास, पालि भाषेत संभाषण तसेच बुद्ध लेणीं सहल आणि त्यातील शिलालेखांचे वाचन व अभ्यास. या अनुषंगाने धम्मलिपि देखील विद्यार्थ्यांना शिकविण्यात येते.
आपण किंवा आपल्या मित्र मंडळींना पालि भाषा शिकायची असेल तर नक्कीच खाली दिलेल्या फॉर्म व फीस भरून ऍडमिशन घेऊ शकता. काही प्रश्न असतील तर कृपया 9545277410 वर संपर्क करा…
More Stories
2024-25 साठी परदेशात मास्टर्स आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या अभ्यासासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था NITCON Ltd संस्थेच्या वतीने मोफत प्रशिक्षण
CET Exam Registration : सीईटी नोंदणीसाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ ; सीईटीचे संभाव्य वेळापत्रक घोषित