रविवार दिनांक १३/११/२०२२ रोजी अशोका वॉरियर्स महाराष्ट्र तर्फे मी पाहिलेली बुध्द लेनी या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे
चित्रकला हा कलेचा एक प्रकार आहे. मानवी सर्जनशीलतेचा अविष्कार यातून दिसून येतो. चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे.लिओनार्डो-द-व्हिन्सी, रॅफेल, मायकेल ॲंजेलो, राजा रवी वर्मा इत्यादी महान चित्रकार ऐतिहासिक कालखंडात होउन गेले.
प्राचीन काळापासून चित्रकला हि मनुष्यास खूप छान प्रकारे अवगत होती. 2000 हजार वर्षापूर्वीच्या कातळात कोरलेल्या बुध्द लेनी त्याचे सुंदर उदाहरण आहे. प्राचीन काळातील लेण्यांमध्ये भारतीय चित्रकलेचा स्रोत आहे. भारत, चीन आणि इजिप्त या देशात प्राचीन काळापासून चित्रकला अस्तित्वात होती.
लहान विद्यार्थी व बालचित्रकारांसाठी या अभिनव चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ठिकाण : दि. 13 नीहेंबर 2022 रोजी 3 वाजता, कोंडिवते लेनी, अंधेरी पूर्व .



इयत्ता 3री ते 5वी हा एक गट , 6वी ते 9वी हा एक गट असे दोन गट असतील.अशा 2 गटांमध्ये ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली जात आहे
मी पाहिलेली लेणी या विषयावर चित्र काढावयाचे आहे. चित्र काढण्यासाठी 1.30 तासांचा कालावधी असणार आहे.
चित्र काढण्याकरिता लागणारा कागद, पेन्सिल, खोडरबर
हे साहित्य अशोका वॉरियर्स महाराष्ट्र मार्फत दिले जाईल. या व्यतिरिक्त लागणारे इतर साहित्य स्पर्धकाने स्वत: आणावयाचे आहे.
चित्र काढण्यापूर्वी कागदावर संयोजकांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक राहील. सहभागी स्पर्धकांनी स्पर्धेच्या वेळेच्या अर्धा तास आधी म्हणजे 2.30 वा. स्पर्धास्थळी येऊन आपल्या उपस्थितीची नोंद करावयाची आहे.
अधिक माहितीसाठी
अनिल जाधव : 7506223874
प्रज्योत कदम : 98194 91543
यशवंत गांगुर्डे : 9702030481
अर्जुन भालेराव : 8652271007
या क्रमांकावर संपर्क साधावा.
आम्हीं बुद्ध लेणीची जागृती अत्यंत वेगळ्या स्वरुपात करीत असून यामध्ये चित्रांच्या स्वरुपातून लेणीबद्दल आदरभाव निर्माण करण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेची संकल्पनाही अत्यंत नावीन्यपूर्ण आहे. चित्रांच्या माध्यमातून बुध्द आणि त्यांचा इतीहास निविन पिढीला अवगत करण्यासाठी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन अशोका वॉरियर्स महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात येत आहे.
स्पर्धकांना खाली दिलेली लिंक वर क्लिक करून पूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. यांची नोंद असावी 

अशोका वॉरियर्स तर्फे सर्व बौध्द उपासक व उपासिका आम्ही निमत्रित करीत आहोत. आपला सर्वांचा सहभाग हेच आमचे यश 

आपण आपला पाठिंबा खालील स्वरूपात देऊ शकता.
1) श्रमदान
2) अर्थदान
3) भोजनदान
आमचा गुगल पे ,फोन पे नंबर – 8652271007
9819491543
महत्वाची टिप:- ही स्पर्धा संपूर्ण ऑफलाईन असणार आहे,,लहान मुलांना लेणी बद्दल म्हणजे काय ह्याबद्दल माहिती मिळण्यासाठी,लेणी बद्दल प्रेम निर्माण व्हावे,बौद्ध लेणी ही आपली धारोहर आहे हा मूळ उद्देश आहे,जास्तीत जास्त मुलांनी ह्या मध्ये सहभागी होऊन आपला वारसा जपावा,वरील दिलेला गुगल फॉर्म भरून आपली नाव नोंदणी करावी.
Ashoka Warriors Maharashtra organized painting competition on Buddha Leni
Painting Competition on Buddha Leni : Ashoka Warriors Maharashtra
More Stories
माध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण