नमो बुद्धाय जयभिम…
धम्म बंधु व भगिनींनो ,येत्या दिं.9 एप्रिल 2022 (शनिवार) रोजी सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत नाशिकच्या त्रिरश्मी बुध्दलेणी येथे महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.या कार्यक्रम माची जय्यत तयारी सुरु असून ती आता अंतिम टप्प्यात आहे. या कार्यक्रमाला पुजनीय भिक्खू संघ, शहरातील सामाजिक, धार्मिक, राजकिय, साहित्य, सांस्कृतिक,कला,संगित,चित्रपट आदी. विविध क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर तसेच विविध बुद्ध विहाराचे पदाधिकारी, धम्म प्रचार प्रसार करणाऱ्या संस्था, संघटनेचे प्रतिनिधी, महिला मंडळ, युवा तरुण मंडळ,धम्म संस्कार वर्गातील विद्यार्थी, समता सैनिक दल आदी. उपस्थित राहणार असल्याने सदर कार्यक्रमाची पूर्वतयारी ही दिनांक 8 तारखेला पूर्ण करावयाची आहे . त्यामुळे या दिवशी आयोजन समितिच्या वतीने आपणास विंनंती करीत आहोत की, आपण देखील एक संपूर्ण दिवस धम्म सेवा करण्यासाठी आवर्जून द्यावा.जेणेकरून आपल्याला ठरलेल्या प्रमाणे वेळेत सर्व कामे योग्य रीतीने पूर्णत्वास नेता येतील. त्यासाठी आपण या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत जसे शक्य होईल तसे श्रमदान देवून प्रत्यक्ष या कार्यात आपला देखील सक्रिय सहभाग नोंदवावा. त्यामुळे या दिवशी किमान 50 धम्मसेवक (महिला व पुरुष)यांची आवश्यकता आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी या धम्मसेवेसाठी बुध्दस्तूप, त्रिरश्मी बुध्दलेणी परिसर येथे अवश्य यावे.
संपर्क-8668300637,7058734003,9960320063,9175151111
आवाहनकर्ते-सम्राट अशोक जयंती उत्सव समिती 2022
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार