कोंडीविटे लेणी अंधेरी मुंबई इथे ३/४/२०२२ रविवारी रोजी सकाळी १०.३० ते ५.३० दरम्यान पार पडला अभ्यास दौऱ्याला मार्गदर्शक म्हणून लोकप्रभाचे ख्यातनाम संपादक तसेच बुध्दीस्ट स्टडीजमध्ये ज्यांनी सुवर्णपदक मिळवला आहे असे माननीय विनायक परब सर उपस्थित होते.
असंघटित समाज त्या रचलेल्या बटाट्या समान आहे की एक जरी बटाटा काढला तरी संपूर्ण ढीग क्षणात खाली कोसळतो तर संघटीत समाज त्या डाळिंबाच्या दाण्यासमान असतो एक जरी दाणा वेगळा केला तरी इतर सर्व दाणे छान सगळे एकमेकांना बिलगून असतात अशी संघटीत आणि असंघटित राहण्याचे फायदे आणि तोटे सरांनी नमूद केले तसेच धम्म त्या अनुसरून स्थापत्य या संदर्भात प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षणाचे महत्त्व महात्मा फुले यांनी कसे ओळख होते तर जगातील लोक बुध्द धम्माकडे तत्वज्ञानाकडे कसे पाहतात व येणार्या दिवसात बुध्द धम्म किती महत्त्वाचे आहे हे सोप्या शब्दात अभ्यास दौऱ्यात आलेल्या उपस्थितीत सदस्यांना पटवून दिले.
सम्यकच्या वतीने प्रफुल्ल पुरळकर सर यांनी पुस्तके भेट देऊन मा. विनायक परब सर यांचे स्वागत केले.
कोंडीविटे लेणी अभ्यास दौर्यावर आलेल्या प्रत्येक सदस्याला ज्ञानाची भुक शमवण्यासाठी मा. संजय सावंत सरांनी प्रत्येक वयोगटा अनुसार पुस्तक भेट म्हणून दिले.
ज्ञानाची भुक भागवण्या बरोबरच पोटाची भुक शमवण्यासाठी दातृत्वाच्या भावनेतून अनेक धम्म दात्यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती त्यात प्रामुख्याने उपासक गुरूनाथ सावंत सर यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे, त्यांनी अत्यंत हिरीरीने आलेल्या प्रत्येक सदस्याची व्यवस्था पाहीली होती.
मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या कार्यशाळेमध्ये प्रत्येकाला आप आपल्या विषयावर बोलण्याची संधी दिली गेली होती त्यामुळे आलेला प्रत्येक सदस्य आपल्या ओंजळीत काही ना काही घेऊन गेलाय हे त्यांच्या समाधानी चेहर्यावरून दिसून येत होते.
अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी अनेक हात झटत होते आपल्या व्यस्त कामाच्या धावपळीतून सारिष डोळस सर अभ्यास दौऱ्याचे नियोजन आखत होते तर आपले कर्तव्य समजून तन मन धनाने सर्वांची व्यवस्था पाहणारे विवेक वाघमारे तसेच आपला वकिली व्यवसाय सांभाळून उत्तम सूत्रसंचालन करत विशाल वाघमारे यांनी मृदू शैलीतून सर्व सदस्यांनवर भूरळ पाडली होती तर प्रफुल्ल पुरळकर सर यांनी दौर्यावर येण्यासाठी सोशल मीडियावर बॅनर बनवण्यापासून ते अभ्यास दौर्यावर आलेल्या सदस्याला कोंडीविटे लेणी माहिती प्रत उपलब्ध करून देत होते.
विशेष म्हणजे सम्यकचे सदस्य डॉ जितेंद्र वड्डीकर सर आपल्या सोबत मेडिकल टिम सह ॲम्बुलन्स घेऊन आले होते.
नेहमी प्रमाणे जेष्ठ नाणी संग्रहक विजय विखरणकर सर यांनी नाणी सोबत आणली होती ती उपस्थितांना दाखवली तर जिज्ञासू प्रवृत्तीने प्रश्नही विचारून घेऊन त्यांचे निरसन करून घेत होते.
अभ्यास दौर्याची माहिती संपूर्ण मुंबईभर होती त्यामुळे लालबागच्या राजाचे सुप्रसिद्ध मूर्तीकार बागवे सरही आवर्जून या दौऱ्यात सहभागी झाले होते. बागवे सर आपला अभिप्राय नोंदवतांना म्हटले की आतापर्यंत आम्ही कुटुंब एकट एकटेच लेणी पाहत आलो होतो अशा प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन होतात व ईतक्या मोठ्या प्रमाणात आजही लेण्यात खूप काही आहे हे आम्हाला आज कळले आम्ही तुमच्या सोबत पुढच्या कार्यक्रमात येऊ असे त्यांनी आवर्जून नोंदवले.
अभ्यास दौर्यावर आलेल्या सर्व सदस्यांचे मनापासून धन्यवाद !
More Stories
भारतीय बौद्ध महासभा – नासिक जिल्हा, तालुका पदाधिकारी नियुक्त समारंभ
राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर येथील ‘विश्वशांती बुद्ध विहार’चे लोकार्पण…
नऊ दिवसीय अट्ठसील अनागारिका सिक्खा शिबिर-२०२४, 9 Days Atthasīla Anāgārikā Sikkhā Shibir 2024