दि.25/6/22 शनिवारी एकदिवसीय ध्यान साधना (विपषणा) शिबिर धम्मदिप बुद्ध विहार अंबरनाथ पु.संविधान भवनात आयोजित केले होते. आयु. रवींद्र बनसोडे यांनी व रोहिणी गायकवाड यांनी मेणबत्ती अगरबत्ती लावली. व डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार घातला. व तथागत प्रतिमा पुजन करून पुष्प अर्पण केले. आयु बनसोडे सर यांना अध्यक्ष बबन सोनवणे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. तसेच आयुनि रोहिणी गायकवाड, प्रियंका गायकवाड यांना गुलाब पुष्प देऊन बबीता ताई व आयु छाया गायकवाड यांनी स्वागत केले.प्रथम भंते याचना करण्यात आली. भंते कश्यप यांनी अष्ठशील दिले. वंदना झाल्यावर आयु रविंद्र गायकवाड यांनी विपषणा सुरु केली. सकाळी 10 ते4 वाजेपर्यंत छान प्रकारे घेण्यात आली. मधे 1.15 वाजता जेवणास सुट्टी दिली. होती. संपूर्ण दिवस कसा गेला ते समजले च नाही. शेवटी देशना आयु.गायकवाड सरांनी दिली. धम्मपालन गाथा होवुन कार्यक्रम संपन्न झाला. शिबिरात बहुसंख्येने उपासक,उपासिका उपस्थित होत्या. आपले विनित। बौध्द एकता विकास मंडळ धम्मदिप बुद्ध विहार अंबरनाथ पु.
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा