अनुसूचित जातीच्या युवक-युवतींना विनामुल्य उद्योजकता विकास परिचय कार्यक्रम- नाशिक विभाग, नाशिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे द्वारा पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), नाशिक यांच्या मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विभागस्तरीय एक दिवसीय विनामुल्य उद्योजकता विकास परिचय कार्यक्रम दिनांक १३.०४.२०२२ रोजी स. १०.३० ते सायं. ४.०० वाजेपर्यंत मातोश्री रमाई सभागृह, डॉ. आंबेडकर नगर, नाशिक पुणे रोड, नाशिक येथे आयोजित केलेला आहे.
इच्छुक उमेदवारांनी नोंदणीसाठी खालील फॉर्म भरून दिनांक १३.०४.२०२२ रोजी स. १०.३० वाजता कार्यक्रमास उपस्थित रहावे.
https://forms.gle/k75s7kYVtfZNi6aR6
कार्यक्रमात बार्टी योजनांची माहिती, उद्योजकीय गुण संपदा, कौशल्य विकास व स्वयंमूल्यांकन, विविध क्षेत्रातील उद्योग संधी व निवड प्रक्रिया, शासनाच्या विविध कर्ज योजनांची माहिती, प्राथमिक प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, बाजारपेठ सर्वेक्षण व सोशल मिडिया मार्केटिंग इ. विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येइल.
अधिक माहितीसाठी:-
श्री. मंगेश बनकर, मऊविके, नाशिक – ९४०५३०८८२१
श्री संजय भामरे, मऊविके, नाशिक – ७७२००७५९०१
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार