October 2, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

Shirpur : शिरपूर येथे “प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना एक दिवसीय बायोफ्लॉक प्रशिक्षण”

०१/१०/२०२५ मौजे विखरण ता. शिरपूर येथे “प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना एक दिवसीय बायोफ्लॉक प्रशिक्षण” या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

प्रामुख्याने या प्रशिक्षण शिबिराचे दिपप्रज्वलन धुळे जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सन्माननीय जयेशजी बळकटे साहेब , TMBRS चे मत्स्य संशोधन अधिकारी मा.डॉ.शशिकांतजी मेश्राम , मा.प्रा.डॉ विवेकजी वर्तक , धुळे जिल्हा मत्स्यविकास अधिकारी मा. संतोषजी देसाई , जिल्हा परिषद सदस्य प्रा. संजय पाटील सर , आवलमाता मत्स्यव्यवसाय सह.संस्था व मत्स्यव्यवसाय सह.उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रविण शिरसाठ , मौजे विखरण गावाचे सरपंच कवरदास भाऊ पाटील , सामाजिक कार्यकर्ते दशरथ भाऊ पाटील , जिप माजी सदस्य वसंत नाना पाटील , शिरपूर कृ.उ.बा.स. संचालक किरण नाना कढरे , शिंदखेडा पं.स. सदस्य भगवान दादा पिंपळे , राजू भाऊ सुर्यवंशी , इंदासराव सर , बालू आप्पा ईशी , भोजू मोरे , विठ्ठल मोरे आदींच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सदर शिबिरात बायोफ्लॉक या विषयावर तज्ञ मार्गदर्शकांनी सविस्तर मार्गदर्शन केले व उपस्थित अधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना आहेत. त्या योजनेचे आपण लाभ घ्यावा अशा सुचना प्रशिक्षण घेणार्‍या लाभार्थ्यांना देण्यात आल्या. तथा बायोफ्लॉक समूह प्रकल्पाच्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले तसेच प्रशिक्षण लाभार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.