रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समिती – मुंबई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) – मुंबई
११ जुलै १९९७ चे रमाबाई आंबेडकर नगर दलित हत्याकांड सर्व शहीदांना क्रांतिकारक अभिवादन !
११ जुलै १९९७ चे रमाबाई आंबेडकर नगरचे भीषण हत्याकांड फुले-आंबेडकरी व पुरोगामी जनता विसरुच शकत नाही.
भाजपा-शिवसेना युतीच्या सत्ताकाळात हे हत्याकांड घडविले गेले. १० जणांचा बळी घेतला गेला. असंख्य जखमी झाले. सारा देश हादरून गेला होता. या हत्याकांडाच्या जखमा अजूनही भळभळत आहेत…. लढाई अजून संपली नाही. देश अत्यंत घातक परिस्थितीतून जात आहे. संविधान आणि लोकशाही संकटात आहे. धार्मिक आणि जातीय उन्मादांनी दहशत आणि भय पसरविले आहे. दलित, आदिवासी, धार्मिक अल्पसंख्यांक यांच्यावरील अत्याचार गंभीररित्या वाढले तर आहेतच पण त्यातील क्रौर्य अधिकच गडद होत चालले आहे. लिंचिंग, सामुहिक हत्याकांडे यांचे प्रकार वाढले आहेत. अंधारयुग सुरु झाले आहे. स्वातंत्र्याचा संकोच होत आहे आणि लोकशाही शेवटचे घटके मोजीत आहे. संविधान धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर…
विचारप्रवर्तन मेळावा
दिनांक ११ जुलै २०२३ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ स्थळ : शहीद स्मारक भवन, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ७५.
कार्यक्रम
■ सकाळी ११ वा. : उद्घाटन उद्घाटक, मा. डॉ. राम पुनियानी (ज्येष्ठ विचारवंत )
■ सकाळी ११.१५ वा. : : सांस्कृतिक कार्यक्रम सादरकर्ते, मा. आश्विन निरभवणे, मा. शकुंतला जाधव
■ दुपारी १२ ते २ वा. : वैचारिक संवाद सत्र १
विषय : दलित आदिवासी अल्पसंख्यांकावरील अत्याचार व त्यांना रोखण्याचे उपाय
अध्यक्ष : मा. अॅड. किरण चन्ने
बीजभाषण : मा. शशांक कांबळे
प्रमुख वक्ते : मा. राजाराम पाटील, मा.सयाजी वाघमारे, मा. गौतम जाधव, मा. सुबोध मोरे, मा. शशांक कांबळे, मा. डॉ. विनोद सातपुते, मा. रविंद्र चंदने, मा. अजय सावंत, मा. अँड.जय गायकवाड, मा. प्रकाश जाधव
■ दुपारी २ ते ३ वा. जेवण
■ दुपारी ३ ते ५ वा. : वैचारिक संवाद सत्र २
विषय: समान नागरी कायदा (Uniform Civil Code) सत्ताधाऱ्यांचा नवा सापळा
अध्यक्ष मा. अँड. राजेंद्र कोरडे बीजभाषण मा. प्रा. वर्षा गायकवाड
प्रमुख वक्ते : मा. डॉ. राम बाहेती, मा. कॉ. उदय चौधरी, मा.डॉ. विकास उबाळे,
मा. इरफान इंजिनिअर, मा.सलीम भाटी, मा. प्रमोद पाटील
■ दुपारी ५ ते ६.४५ वा. : वैचारिक संवाद सत्र – ३
विषय : फॅसिझमचे भारतीय प्रारूप व त्याच्या प्रतिरोधाचा वैचारिक व कृतीबध्द कार्यक्रम अध्यक्ष : मा. आनंद पटवर्धन (जागतिक किर्तीचे चित्रपट दिग्दर्शक)
बीजभाषण: मा. मिलिंद भवार
प्रमुख वक्ते : मा. डॉ. राम पुनियानी, मा. प्रा. शुक्राचार्य गायकवाड, मा. मिलिंद गायकवाड, मा. जयवंत हिरे, मा. महेंद्र पंडागळे
■ दुपारी ६.४५ ते ७ वा. : समारोपाचे गोषवाऱ्याचे भाषण मा.श्यामदादा गायकवाड हे करतील.
आपला समाज, सकल भारतीय
आपले विनित रमेश धर्मा जाधव, अभिमन्यू भालेराव, सदानंद अडकमोल, जगन्नाथ आंगले, अविनाश खरात, महादेव गोडबोले, लक्ष्मण जाधव, किशोर गरुड, अँड परितोष गायकवाड, प्रमोद गायकवाड, हिरामण गायकवाड, प्रशांत दिवे, विलास निकम, प्रकाश दुपारगुडे, शैलेश अढांगळे, दामु अढांगळे, अजिंक्य गायकवाड, दिलीप केदारे, योगेश लोखंडे, शरद साळवे, योगेश संसारे, दिनेश गायकवाड, शैलेश खरात, बुध्दभूषण सुर्वे, प्रदीप गायकवाड, शेखर वाघमारे, विवेक खैरे, हरेश जाधव, अॅड. सिध्दार्थ साबळे, रमेश पळसपगार, सुयोग पवार, प्रेमनाथ जाधव, दिपक माघाडे, विलास उपशाम
More Stories
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार
OKUTTAR LOKUTTARA MAHAVIHAR लोकुत्तर महाविहार येथे एक दिवसीय विपस्सना शिबिराचे आयोजन…
02 March – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन