July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

त्रिरश्मी बहुउद्देशिय सोसायटीच्या वतीने मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर यांना निवेदन दिले.

नवीन नाशिक प्रतिनिधी : अंबड गावालगत असलेल्या गट नंबर २६९ मध्ये वडिलोपार्जित जागेत सुरु असलेल्या ध्यान, विपश्यना साधना केंद्र व वाचनालय-अभ्यासिकेला काही समाजकंटक खोट्या तक्रारी दाखल करून लोकांची दिशाभुल करून सदरच्या जागेच्या बांधकामात अडचणी निर्माण करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्रिरश्मी बहुउद्देशिय सोसायटी,अंबडच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर यांना निवेदन दिले.

त्रिरश्मी बहुउद्देशिय सोसायटी,अंबड तर्फे मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या या निवेदनात असे नमूद केले आहे कि, अर्जदार संस्था व राजवाड्यातील संपूर्ण रहिवासी गट नंबर २६९ वरील वडिलोपार्जित जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व धार्मिक कार्यक्रम घेतात.सदर जागेत अनेक वर्षांपासन सामाजिक उपक्रम चालु असतांना जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत.ही राजवाड्यातील लोकांची वडिलोपार्जित असुन त्या ठिकाणी पूर्ववत स्मशानभूमी होती, आजही त्या जागेचा उतारा स्मशानभूमी या नावाचा आहे, या जागेत इतर लोकांचा काहीही अधिकार नसून काही लोक हि जागा बळकावण्यासाठी खोट्या तक्रारी करत आहेत. सदर जागा १० गुंठे रेकॉर्डला आहे. परंतु संबंधित जागेचे कंपाऊंड है १० गुंठे दिसत नाही, अशी राजवाड्यातील लोकांची शंका आहे. तक्रारी खोट्या असल्याने त्यांची दखल घेतली जाऊ नये याठिकाणी होणाऱ्या ध्यान, विपश्यना साधना केंद्र व वाचनालय-अभ्यासिकेचा परिसरातील नागरिकांनाच फायदा होणार असल्याने आमच्या श्रद्धा स्थान असलेल्या प्रतिमांना संरक्षण म्हणून शेडचे बांधकाम पाडू नये व बांधकाम पुर्ण करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अंकित दोंदे, आबा दोंदे, डॉ. रतन दोंदे, वसंत दोंदे, राजेंद्र दोंदे, बालू दोंदे, सोनाली पाठक, प्रदिप दोंदे, संकेत दोंदे, माया दोंदे, शकुंतला दोंदे, धनंजय दोंदे, मनिष दोंदे, योगिता दोंदे, दिपाली सोनावणे, राहूल सोनावने, बाबू दोंदे, भालचंद्र दोंदे, ज्ञानेश्वर दोंदे, दिपक साबळे, गौतम दोंदे, अलका दोंदे, भारती दोंदे, अनुसया दोंदे, मोनिका दोंदे, मंगल गणकवार, बायजाबाई बनसोडे, भारती दोंदे, चंद्रकला दोंदे , देऊबाई दोंदे, बेबी दोंदे, सावित्री साळवे आदी उपस्थित होते.