August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

OKUTTAR LOKUTTARA MAHAVIHAR लोकुत्तर महाविहार येथे एक दिवसीय विपस्सना शिबिराचे आयोजन…

(छत्रपती संभाजीनगर दि २८) अखिल भारतीय भिक्खु संघाचे अनुसंघनायक भदन्त बोधिपालो महाथेरो यांच्या वैज्ञानिकदृष्ट्या प्रमुख मार्गदर्शनात रविवार दि २ मार्च, २०२५ रोजी लोकुत्तर महाविहार चौका, अजिंठा रोड, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एक दिवसीय विपस्सना शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनंदिन जीवनामध्ये वेगवेळ्या प्रसंगात उत्पन्न होणारे ताण-तणाव, नैराश्य, चिडचिडेपणा, क्रोध, इर्षा, अहंकार, गर्व, दुःख उत्पन्न करणाऱ्या विकारांना कमी करण्यासाठी व मैत्री, करुणा, दया, उदारता, प्रसन्नता, सुखशांती निर्माण होण्यास भगवान बुध्दांनी उपदेशलेले ध्यान साधना भदंत बोधिपालो महाथेरो शिकवणार आहेत.
यामध्ये १८ वर्षापेक्षा अधिक वयोगटातील महिला आणि पुरुषांना सहभागी होता येईल. साधकांनी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून, स्वतः भोजनाचा डब्बा सोबत आणणे आवश्यक आहे. या शिबिरात जास्तीत-जास्त उपासक उपासिकांनी सहभागी होऊन लाभघ्यावा, असे आवाहन लोकुत्तर महाविहाराच्या वतीने महासचिव भदंत काश्यप महाथेरो, भिक्खु धम्मानंद, भिक्खु विनयशिल, भिक्खु धम्मरतन, भिक्खु बी राहुलो, भिक्खु उपाली, भन्ते इध्दिपय्यो यांनी केले आहे. प्रवेश संख्या मर्यादित असल्यामुळे पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रशिक्षक आचार्य  : पु. भदन्त बोधीपालो महाथेरो
अध्यक्ष-लोकुतरा चॅरिटेबल मिशव, औरंगाबाद अनुसंधकाचक – आखिल भारतीय भिक्खु संघ बोधगया ( बिहार )
अधिक माहितीसाठी संपर्क
भदन्त काश्यप महाथेरो 8806030404
विनिता सातदिवे 9822276704
आर. आर. लेमाडे 9422201222

OKUTTAR LOKUTTARA MAHAVIHAR
International Bhikkha Training Centre, Chenka, Ajanta Road, Aurangabad (MS) INDIA