वाहन संबंधी बहुतांश कामे आता ऑनलाईन झाल्याने, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातही संगणकीकरण झाल्याने वाहन संबंधी कामे करणे सोपे झाले आहे.
शासनाच्या नवीन धोरणानुसार आता नवीन आरसी, तसेच लायसन्स प्रिंट करून देण्याचा ठेका दिलेल्या कंत्राटदाराकडून आरसी व लायसन्स प्रिंट करताना त्यावर आता संबंधित वाहन चालकाचा क्यूआर कोड व रक्तगट याबाबतची माहिती प्रिंट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
जर अवयव दान करायचे असेल तर वाहन परवाना काढताना अर्जावर अवयवदान करायच्या रकान्यात टिक मार्क केलेले क्यूआर कोडमुळे वाहनचालक, असल्यास त्या व्यक्तीने अवयवदान तसेच वाहनाची संबंधित माहिती करण्यास इच्छुक होती की नव्हती याची माहिती मिळेल.
तत्काळ उपलब्ध होणार आहे.
सर्व माहिती भरावी
आरसी व लायसन्सवर क्यूआरकोड, रक्तगट हे प्रिंटिंग करण्याचे शासनाने ठरवून दिलेले धोरण आहे. ज्या सेंटरला दिले त्या अटी, शर्थीला अधिन राहून त्याचे काम चालू आहे. संगणकीकरण झाल्यामुळे क्यूआरकोडवरून वाहन संबंधी सर्व माहिती उपलब्ध होते.
-प्रशांत देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
आरसी बुक लायसन्सवर काय राहणार – क्यूआर कोड, रक्तगट
शासनाकडून वाहन आरसी, तसेच वाहनचालकांच्या लायसन प्रिंटिंगचा नव्याने ठेका दिलेल्या ठेकेदाराकडून नव्या धोरणानुसार लायसन्सवर संबंधित वाहन मालकाचा रक्तगटदेखील प्रिंट केला जात आहे. एखादा वेळी अपघात झाल्यास अपघातात गंभीर जखमी झाल्यास रक्ताची गरज पडली तर रक्तगट प्रिंट केला असण्याची शक्यता आहे.
पूर्वी प्रिंट केल्या जाणाऱ्या लायसन, तसेच आरसीवर पितळी चीफ लावलेली असायची. हे कार्ड मशीनला जोडल्यानंतर संबंधित वाहन व मालक माहिती मिळायची. शासनाच्या नवीन धोरणानुसार आरसी बुकवर क्यूआर कोड प्रिंट केला जात आहे. क्यूआरकोडमुळे वाहन संवर्ग, मालक, वाहनावर कर्ज असल्यास बँकेचे नाव वाहन चेसी क्रमांकाची माहिती आहे.
मुंबई : स्मार्टकार्ड वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) छपाईसाठी नवीन करार करण्यात आला असून नव्या आरसी आणि लायसन्स चिपऐवजी क्यूआर कोड असून डिजिटल स्वरूपात ते उपलब्ध होणार आहे. कार्डवर अवयवदानासह रक्तगटाचीही माहिती देण्यात आली आहे. ऑगस्टपासून सर्व वाहनचालकांना नवीन आरसी बुक येत आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली.
नव्या रूपातील स्मार्ट कार्ड पुरवण्याचे कंत्राट कर्नाटकातील एमसीटी कार्ड अँड टेक्नॉलॉजी कंपनीला देण्यात आले असून वितरण सुरू आहे. स्मार्ट कार्ड निळ्या रंगाचे आहे. कार्डाच्या पुढील बाजूस नाव, पत्ता, जन्मतारीख, अवयवदानासह रक्तगटाची माहिती असेल. मागील बाजूस क्यूआर कोड व कार्डच्या मुदतीसह इतर माहिती आहे.
कोणते आरसी बुक कुठे होतंय तयार?
एमएच – ०१ ते एमएच – १७ पर्यंतचे आरसी बुक मुंबईत तयार होत आहे. तर एमएच १८ ते एमएच – ३४ पर्यंतचे आरसी बुक छत्रपती संभाजीनगर येथे तयार होत आहे. त्याचप्रमाणे एमएच ३५ ते एमएच – ५१ क्रमांकांपर्यंतचे आरसी बुक नागपूर शहरात तयार होईल.
More Stories
वडील-भावाकडे ‘जातवैधता’ असताना इतर कागदपत्रांची गरज नाही
RTE News 2024 : आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना शासकीय नसेल तर खासगी शाळांना प्राधान्य
1 जुलैपासून आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायद्याच्या जागी भारतातील तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत.