December 24, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

भारत देशामध्ये प्रथमच भिकूंच्या अस्थि जतन करण्याचा निर्णय घेतला – बुद्धिस्ट भारत टीम

नाशिक शहरामध्ये भदंत आर्यनाग थेरो यांचे उपचाराच्या दरम्यान दुःखद निधन झाले त्यांचे धम्मकार्य अविरत जिवंत ठेवावे तसेच भारत देशामध्ये यापुढे कुठलाही भिक्खु, औषधाविना किंवा अन्नाविना त्रास सहन करून निधन होवू नयेत

भंते आर्यनाग थेरो यांच्या धम्म कार्याचा वारसा स्मरणात राहावं म्हणून अस्थीचे जतन केले जाणार आहे.
भंते आर्यनाग थेरो यांच्या स्मरणार्थ लवकरच बुद्ध विहार जोडो मोहिमे भिक्खू संघास योग्य ती मदत करण्याचे संकल्प, तसेच बौद्ध समाजाच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने बुद्ध विहार जोडो मोहीम राबवली जाणार आहे असे बुद्धिस्ट भारत टीमचे प्रमुख सिद्धार्थ भालेराव, आबासाहेब डोके, स्वप्नील पगारे आणि सहकारी यांनी संकल्प सुरू केला आहे.

अमरधाम नाशिक येथे भिक्खु संघाच्या वतीने सिद्धार्थ भालेराव, आबासाहेब डोके, स्वप्नील पगारे आणि त्यांच्या टीमला भदंत आर्य नाग थेरो यांच्या अस्थि सुपूर्त करण्यात आल्या यावेळी भिक्खू संघ आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते