February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्त कार्यालयावर विविध मागण्यांसाठी आंदोलन

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्रजी कवाडे सर,आणि कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या आदेशाने नाशिकरोड येथे महसूल आयुक्त कार्यालयावर विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले,यामध्ये जातीवादी संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी

तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती असल्याने महसूल आयुक्त कार्यालयावर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राला प्रस्ताव द्यावा व इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले असून हे आंदोलन गणेशभाई उन्हवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून नेतृत्व जिल्हाध्यक्ष शशिभाई उन्हवणे यांनी केले,यावेळी आंदोलनात साराभाई वेळुंजकर,भागवत डोळस,मुरलीधर घोरपडे,रवी खरात,भागवत डोळस,देविदास डोखे,नितीन पगारे,कैलास शिंदे,प्रवीण पगारे,सुनील खत्री,रवी पगारे,शकील शेख,जावेद शेख,सलमान खान,नंदू जाधव,आबिद शेख,दर्शन पगारे,रफिक टकारी,मनोज अहिरे,गोविंदा शिंगारे,विशाल गायधनी,अलका निकम,लक्ष्मी गडगडे,सुनिता कर्डक,निर्मला सोनवणे,संगीता वाघ,गयाबाई काळे,ज्योती अहिरे,आदी महिला पुरुष मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते