January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

भिक्खू संघाला पाथर्डीगावातील विश्वदिप बुध्दविहारात आमंत्रित करून भोजन,फलाहार, आर्थिक दान

नाशिक :  दिनांक 1 ऑगस्ट 2021 (रविवार) वर्षावास मंगल पर्वातिल 9 वा दिवस-
आजच्या दिवशी भिक्खू संघाला पाथर्डीगावातील विश्वदिप बुध्दविहारात आमंत्रित करून भोजन,फलाहार, आर्थिक दान देणारे श्रद्धावान उपासक/ उपासिका आणि परिवार *आयु.भगवान (नाना) दोन्दे,नगरसेवक (नाशिक म.न. पा.) बौद्धाचार्य आयु.सुधिरजी दोन्दे गुरुजी,आयु.शामराव लोखंडे, आयु.गौतमभाऊ दोन्दे व समस्त बौध्द बांधव भगिनींचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व सर्वांप्रती मंगल कामना.बुध्द, धम्म व संघ प्रतापाने आपले मंगल होवो
यावेळी बुध्दविहारात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला नगरसेवक आयु भगवान(नाना) दोन्दे यांनी पुष्पहार अर्पण केला. पुज्य भन्ते अश्वजित(थेरो) यांनी अण्णाभाऊच्या जीवन संघर्षाची माहिती देवून जयंती निमित्त जनतेला मंगलकामना दिल्या. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ उपासक,बौध्द, धम्म,व संघावर गीते लिहिणारे सुप्रसिद्ध गीतकार पि. कुमार धनविजय, बौद्धाचार्य सुधीरजी दोन्दे गुरुजी, बौद्धाचार्य मिलिंद बनसोडे गुरुजी,बौद्धाचार्य संजय भरीत गुरुजी, उपासक गौतमभाऊ दोन्दे, आयु.शामराव लोखंडे,उपासक ताराचंद भाऊ मोतमल,उपासिका मंदाकिनीताई दाणी आदी. ग्रामस्थ उपस्थित होते.