January 13, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

नाशिक मध्ये ०५ मार्च २०२४ मार्गदर्शक वंदनीय आचार्य धम्मपाला भंतेजी – धम्मदेसना

मार्गदर्शक वंदनीय आचार्य धम्मपाला भंतेजी (संस्थापक, सी.आर.व्ही.एम. सेंटर, पोखरा, नेपाळ)
आपल्या दैनंदिन जीवनात धम्म आचरण कसे करावे ? विपश्यना साधनेद्वारे शरीर, श्वास आणि मन (नाम रूप व आलंबन) यांचे संतुलन कसे साधावे ?
ह्या महत्त्वपूर्ण विषयाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष ध्यान-साधना (प्रॅक्टिकल) आणि धम्मदेसना (थेअरी) हा मूलभूत उद्देश समोर ठेवून धम्म संस्कार प्रचार प्रसार व प्रबोधन समिती, नाशिक यांच्या विद्यमाने सामूहिक ध्यान-साधना आणि धम्म देसना सेशन्स आयोजित करण्यात आले आहे.

मंगळवार, दि. ०५ मार्च २०२४ : सायं. ४:०० ते ५:०० वा. सामूहिक ध्यान-साधना (प्रॅक्टिकल)
सायं, ५:०० ते ७:०० वा. जाहीर धम्म-देसना (थेअरी)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह. डॉ. आंबेडकर नगर, नाशिक – पुणे हायवे, नाशिक.
तरी, धम्ममार्गातील या महत्वपूर्ण विषयावर आयोजित उपक्रमात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विपश्यना साधनेचा आणि धम्म देसनेचा लाभ घ्यावा असे विनंतीपूर्वक आवाहन.
‘कृपया कार्यक्रमाला येताना सर्वांनी श्वेत वस्त्र (पांढरे वस्त्र) परिधान करावे.’
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे
* संयोजक * धम्म संस्कार प्रचार-प्रसार व प्रबोधन समिती, नाशिक. * अधिक माहितीसाठी संपर्क * ८७९३० ७०८ १९