February 5, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

⛩️ भारतीय बौद्ध महासभा शाखा वासिंद पूर्व अध्यक्षपदी नलिनीताई घनमोडे यांची निवड ⛩️

दिनांक.16 ऑगस्ट 2021 वार सोमवार रोजी दु.2.30 रोजी ठिकाण ” श्रlवस्ती ” बुद्ध विहार वाशिंद पूर्व येथे ” श्रावस्ती ” बहुउद्देशिय बहुजन सामाजीक संस्था याच्या मार्गदर्शना खाली नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली .
या सभेचे अध्यक्षस्थान शहापूर तालुक्याचे अध्यक्ष आद.बाळाराम संभाजी वाढवीदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या कार्यक्रमाला शहापूर तालुक्याचे संपर्कप्रमुख आद. कांतीलाल भडांगे गुरुजी ,शहापूर तालुका सरचिटणीस दीपेश कांबळे गुरुजी, शहापूर तालुका माजी अध्यक्ष आद भरत धनघाव गुरुजी ,संस्कार विभाग उपाध्यक्ष आद मगन गवळे गुरुजी ,कार्यालयीन सचिव आद जगदीश थोरात सर, प्रचार पर्यटन उपाध्यक्ष विजय भोइर सर ,संस्कार सचिव आद मनोज साळवे गुरुजी, संघटक आद नयन उबाळे या तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना ने झाली त्यानंतर वाशिंद पूर्व शाखेच्या अध्यक्षा आद. निर्मलाताई गांगुर्डे व त्यांच्या कार्यकारिणीने उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आद. सरचिटणीस स्मिताताई सोनारे यांनी केले. तर कार्यक्रमाचअहवाल वाचन नलिनीताई घनमोडे यांनी केले. त्यानंतर नवीन कार्यकारणी निवडीसाठी तालुका शाखेकडून कार्यकारिणीत सहभागी होण्यासाठी फार्म भरून घेण्यात आले व त्यानंतर निवड प्रक्रिया करण्यात आली.
त्यानंतर मावळत्या अध्यक्ष आद निर्मलाताई गांगुर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तालुका अध्यक्ष आदं. बाळाराम वाढवीदे गुरुजी ,तालुका संपर्कप्रमुख आदं कांतीलाल भडांगे सर ,माजी अध्यक्ष भरत घनघाव गुरुजी ,सरचिटणीस आद .दीपेश कांबळे गुरुजी यांनी मार्गदर्शन व नवीन कार्यकारणी चे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला ज्येष्ठ बौद्धाचार्य घोडेस्वार गुरुजी, साळवे गुरुजी ,गांगुर्डे गुरुजी ,माजी सरचिटणीस सिद्धार्थ साळवे गुरुजी, कोबाळकर साहेब, नरेश उबाळे साहेब हे उपस्थित होते त्यानंतर आभार प्रदर्शन केंद्रीय शिक्षिका नवनिर्वाचित संस्कार उपाध्यक्ष आद. विजयाताई दामोदरे यांनी केले व त्यानंतर सरनतय घेऊन कार्यक्रम समारोप करण्यात आला.

वासिंद पूर्व ची नवनिर्वाचित कार्यकारणी पुढील प्रमाणे-

1) अध्यक्ष – नलिनीताई घनमोडे
2)सरचिटणीस – स्मिताताई सोनारे
3)कोषाध्यक्ष- ज्योतीताई कोबाळकर
4)संस्कार उपाध्यक्ष -विजयाताई दामोदरे
5)महिला उपाध्यक्ष- ज्योतीताई बर्वे
6)प्रचार पर्यटन उपाध्यक्ष -निर्मलाताई गांगुर्डे
7) संरक्षण विभाग उपाध्यक्ष -दिलीप गांगुर्डे
8)हिशोब तपासणीस -विष्णू साळवे
9)संस्कार सचिव – सुनंदाताई साळवे
10)महिला सचिव- गीताताई भोसले
11)प्रचार पर्यटन सचिव -निराशाताई जाधव
12)संरक्षण सचिव -आम्रपाली ताई अहिरे
13)संघटक- विद्याताई वाघ

आपले अध्यक्ष

” श्रावस्ती ” बहुउद्देशिय बहुजन सामाजीक संस्था
प्रसार धम्म मित्र / सुनिल कोबाळकर