🌹💐 सस्नेह निमंत्रण 💐🌹
मिशन एम्पाॅवरमेंट, नाशिक आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई), नाशिक यांचे संयुक्त प्रतिनिधित्व करणाऱ्या संविधान सन्मान समितीने कालिदास कलामंदिर, शालिमार, नाशिक येथे दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी स. ११.०० वा. संविधान गौरव दिन सोहळ्यानिमित्त “वि द पीपल” या सामाजिक प्रबोधनपर सांस्कृतिक संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
संविधान जनजागृती, संविधान साक्षरता मिशन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानाविषयी सकारात्मक संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे या मुख्य उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संगीत-नाट्य प्रयोगातून छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्री, महामानव बोधिसत्व, परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांसारख्या युगप्रवर्तकांच्या महामानवांच्या, महापुरुषांच्या तसेच थोर समाजसुधारकांच्या जीवनावर आधारित काही अत्यंत निवडक, उल्लेखनीय व महत्वपूर्ण प्रसंगांचे/घटनांचे सादरीकरण केले जाते.
स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोविड प्रोटोकॉल पाळणे बंधनकारक असल्यामुळे एण्ट्री बाय इन्व्हिटेशन यानुसार मर्यादित स्वरूपात फक्त ४५० प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
सदर कार्यक्रमास आपली सन्माननीय उपस्थिती कृपया प्रार्थनिय…
( कार्यक्रम सर्वांसाठी खुला व मोफत आहे. परंतु प्रवेशिका आवश्यक आहे )
आपले विनीत,
संविधान सन्मान समिती, नाशिक.
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार