July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

चैत्यभूमी परिसरात पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि राजगृह येथे मांडलेल्या पुस्तकांच्या विविध स्टॉल्सवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या तसेच अन्य लेखकांच्या विविध पुस्तकांच्या विक्रीला यंदा जोरदार प्रतिसाद मिळाला. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयातर्फे पुस्तके ही अर्ध्या किमतीत विकण्यात आल्यामुळे वाचकांनी एकच गर्दी केली होती. अन्य वर्षांच्या तुलनेत यंदा पुस्तक विक्रीचा मोठा व्यवसाय झाला आहे.

१०० कोटींचा व्यवसाय झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दादर स्थानकापासून रस्त्यांच्या दुतर्फा पुस्तक विक्रीचे लहान-मोठे स्टॉल्स मांडण्यात आले होते. नाममात्र दरात या पुस्तकांची विक्री होत असल्याने बहुतांश नागरिकांनी पुस्तकखरेदीला पसंती दिली. मैदानाच्या प्रवेशद्वारावर एलइडी स्क्रीन उभारून चित्रफितीच्या माध्यमातून पुस्तकांची माहिती देण्यात येत होती.
त्याशिवाय दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे, मूर्ती, निळ्या रंगाचे फेटे यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. सोबतीला गौतम बुद्ध यांच्या विविध मूर्ती, नेकलेस यांचेही स्टॉल्स होते.