November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर; २०२५ मध्ये धम्मदीक्षेचा भव्य सोहळा

Nagpur News २०२५ साली दिल्लीतील रामलीला मैदानावर धम्मदीक्षेचा भव्य कार्यक्रम होणार असून त्यात कोट्यवधी लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतील, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

नागपूर : देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर आहेत. त्यासाठी २०२५ साली दिल्लीतील रामलीला मैदानावर धम्मदीक्षेचा भव्य कार्यक्रम होणार असून त्यात कोट्यवधी लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतील, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले होते. भीमराव यांनी सांगितले की, एससी-एसटी, ओबीसींसह एकूणच बहुजन समाजाचा मूळ धर्म बौद्ध धम्म आहे. यावर आता विविध समाजघटक उघडपणे चर्चाही करू लागले आहेत. आपल्या मूळ धम्मात परतण्याची लोकांची इच्छा बळावत चालली आहे. भारतीय बौद्ध महासभा देशभरात फिरून जनजागृतीचे कार्य करीत आहे. परंतु हे करीत असताना कुठलाही द्वेष, टीका केली जात नाही. केवळ बुद्धाचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले जाते. २०२५ सालचे नियोजन आम्ही केले आहे. त्यावर्षी कित्येक कोटी लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतील. मूळ कार्यक्रम दिल्लीत होईल. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांमध्येही धम्मदीक्षेचे कार्यक्रम होतील.