November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

वर्षावास उत्सव-निमित्त खारघर- नवी मुंबई येथे. मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..

बौद्ध एकत्रीकरण व सक्षमीकरण संस्था. आणि तथागत महाविहार खारघर-नवीमुंबई सेक्टर १२ यांच्या संयुक्त विद्यमाने. वर्षावास उत्सव निमित्त दिनांक २ ऑक्टो २०२१ शनिवार रोजी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शना अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. भन्ते संघरत्न व संस्थेचे पदाधिकारी. डॉक्टरांच्या प्रमूख उपस्थित सकाळी ठिक ९ वाजता सामुदायिक त्रिसरण पंचशील घेऊन या शिबिराचे उदघाटन प्रसंगी….
बौद्ध एकत्रीकरण व सक्षमीकरण संस्थेच्या.
मा. सीमाताई जाधव ( नवीमुंबई जिल्हाध्यक्ष )
मा. गौतम वानखेडे- कोकण विभाग प्रमुख
तथागत महाविहार सामाजिक संस्थेचे-
मा. छगन खरात सर- ( अध्यक्ष )
मा. प्रा.सुशील महाडिक सर ( सेक्रेटरी )
मा. शशिकांत दामोदर सर ( खजिनदार )
प्रबुद्ध महिला संघ खारघर
मा. अनिताताई झोडापे ( अध्यक्ष )
मा.अर्चनाताई डेकाटे ( सेक्रेटरी)
मा.जयाताई सहारे ( खजिनदार )
धम्म उपसिका संघ खारघर
मा. रेखाताई कांबळे ( अध्यक्ष ) आयोजक व सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.….
या आरोग्य शिबिराचे उपक्रमात…
प्रबुद्ध महिला संघ खारघर. बहुजन विद्यार्थी परिषद- खारघर. भारतीय बौद्ध महासभा शाखा खारघर. धम्म उपसिका संघ- खारघर. संयुक्त जयंती उत्सव कमिटी. खारघर . मूलगंधकुटी बुद्धविहार- जुहीनगर. सम्राट सामाजिक प्रतिष्ठान. पनवेल. ऑनलाईन इंग्लिश स्पिकिंगय क्लासेस.नेरुळ. तनिष्का सिंगिंग आर्ट – नेरुळ. आकाशदिप शैक्षणिक संस्था नेरुळ. राजहंस बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था- नेरुळ
सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाजसेवी संस्थांनी आपला सहभाग नोंदवला…..
सायंकाळी संस्थेच्या मान्यवरांचे हस्ते उपस्थित डॉक्टर टीम चे आभार मानून गुलाब-पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. परिसरातील बहुसंख्य बौद्ध बंधू भगिनींनी या शिबिराचा लाभ घेतला.