...माणसं जन्मान मोठी असतात
तर काही माणसं स्वकर्तुत्वावर
मोठी होतात आणि समाजाच्या
उद्धारासाठी झटत असतात.
मानवाधिकाराचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितल्याप्रमाणे अविद्या किती युगाचा अनर्थ करू शकते, हे या देशाच्या तथाकथित विद्याविरोधी इतिहासाने हे दाखवून दिले आहे़,तर सुविद्येमुळे राष्ट्राचे सर्वजन हिताय उज्वल व सुसंस्कृत चारित्र्य फुलविता येते़ हे विद्याउपासक आपल्या धम्म नायकांनी दाखवून दिले आहे, परिवर्तनाची अपेक्षित फलश्रृती निष्कलंक मानवतावादी दृष्टिकोनातून सिद्ध होते़, आपल्या क्रांतीपुरूषांचे समाजाला हेच सांगणे आहे़. परंतु या कानातून ऐकणे व त्या कानातून सोडणे असा धर्म निभावून किंवा प्रसिद्धी पोटी परिवर्तनाच्या गोष्टी करणाऱ्यांनी परिवर्तनाचे मूलभूत उद्दिष्ट व सार्वजनिक समाज सहिष्णूतेचे तत्त्व केवळ धोक्यात आणण्याचे प्रकार चालवले जात होते़! अशा तरीही धीरगंभीरपणे कुठल्याही अकारण प्रसिद्धीचा हव्यास न धरता आपले एकूणच आयुष्य सिद्धार्थ गौतम बुद्ध व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिद्धांतावर झोकून देऊन त्यांना अपेक्षित सामाजिक परिवर्तनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांचा जन्म हिवरा दरने येथे झाला असला तरी यवतमाळ पासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील कोटंबा या लहानशा गावातून मारोतराव भिवाजी डांगे धम्म आणि समाजकार्य करीत होते.
‘धम्मपीती सुख-सेती, निप्पसन्नेन चेतसा
अरियप्पवेदिते धम्मे , सदा रमति पण्डितो’
धर्म जो पितो समजून घेतो,तो प्रसन्न चित्ताने सुखपुर्वक झोपतो व बुद्धाच्या धम्म विचाराबरोबर सदैव रमतो, तोच पंडित होतो. याच धम्मवाणी प्रमाणे मारोतराव भीवाजी डांगे एक धम्मज्ञानी महाउपासक होते.
… युगाचा अंधार जाळण्याचे सामर्थ्य डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षितांना दिले, आणि धम्मक्रांती नंतरच्या काळात परिवर्तनाचे आमूलाग्र प्रयोग फूलारून आले. अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी जो ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हा मानवतावादी संदेश दिला तोच मूळ मातीत रुजवण्याचा प्रयत्न ते सतत करीत होते.
मानवी हक्क नाकारणाऱ्या समूहासोबत संघर्ष करण्यासाठी मरायलाही तयार असलेली माणसं बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित ‘समता सैनिक दलाने’ तयार केली. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचे नेतृत्व मार्शल मा. भी. डांगे करीत होते. त्यांच्या हृदयात बुध्द तत्व ज्ञानाने घट्ट पकड केली होती. धम्माचा त्यांचा अभ्यास सखोल होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे ऐतिहासिक धम्मक्रांती घडविली होती.त्या धम्मदिक्षेचे प्रत्यक्ष साक्षीदार मा.भी. डांगे होते, त्यांनी ‘याच देहि याच डोळा’ धम्मदिक्षा सोहळा अनुभवला, म्हणून त्याच उर्जेने आपल्या कार्यकर्त्यासह ग्रामिण भागात बाबासाहेबांचे विचार आणि धम्मक्रांतीचे वीज ते पेरत होते. याच काळात बाभुळगाव तालुक्यातील नांदोरा गावात मागासवर्गीयांना विहिरीवर पिण्याचे पाणी भरण्यास प्रस्थापितांनी विरोध केला, म्हणून मा.भी. डांगे यांनी आपल्या सहकाऱ्यासमवेत नांदोरा येथील पाण्यासाठी घडलेली दंगल बाबासाहेबांच्या विचाराने शमविली आणि सर्वांना पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवून दिला. येथूनच त्यांचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व फुलू लागले़ आंबेडकरी चळवळीमध्ये मा.भी.नी जीवाला जीव देणारी माणसं उभी केली, १९५७ मध्ये कोटंबा येथे त्यांनी कार्यकर्त्यांची सभा बोलविली तेथे उपस्थितांना शोषण मुक्तीचे धडे दिले़,
ज्या सिद्धार्थ गौतमाने बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती करून सम्यक सम्बुद्ध झाले त्याच मूळ बोधीवृक्षाची कलम सारनाथ येथून आणून पूज्य आचार्य धर्मर्किर्तीजी महाथेरो व मा.भी. डांगे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापित केली. कोटंबा येथील बोधिवृक्षाला १४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र वामनराव गोडबोले, तु. ग.पाटील, यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी मा.भी. डांगे यांच्या प्रयत्नाने १९८२ ला कोटंबा येथे आणल्या,
… मा.भी. डांगे यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाने *भदंत आनंद कौसल्यायन, न्यायमूर्ती आऱ आऱ भोळे, पी़ एन राजभोज, बी. सी. कांबळे, दादासाहेब रूपवते, आऱ डी़ भंडारे, रा़ सु़ गवई, बॅरिस्टर खोब्रागडे अशा दिग्गज मान्यवरांचा सहवास लाभला. शिक्षणाने जीवनाच्या सर्व क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणले, समाजाचे चरित्र संवर्धन हे परिवर्तनशील शिक्षणाचे मुख्य ध्येय तर त्यातून नैतिक बुध्दी दृढ करने हे शाळेचे उद्दिष्ट असले पाहिजे, याच उद्दिष्टपूर्ती करिता आपल्या जीवनाप्रतीचा ध्येयवाद बुद्ध संदेश शिक्षण प्रचार सभा कोटंबा या संस्थेची स्थापना करून तथागत विद्यालय व मुली आणि मुलांचे वसतीगृह मोठ्या कष्टाने मा.भी.डांगे यांनी उभे केले .
*’वादळासारख्या झंझावाता
तू ज्योतीसारख सामर्थ्य दिलं,
निशब्द मूक्यांना धम्म आणि.
शिक्षण घेऊन तु मोठे केल’
मा.भी. डांगे यांनी कोटंबा परिसरामध्ये विविध धम्म परिषदा घेऊन कार्यकर्त्यांना एकसंघ बांधण्याचा प्रयत्न केला़ त्यांनी १९६७ ला कोटंबा येथे जागतिक धम्म परिषद आयोजित केली होती. त्या करिता जागतिक धर्मगुरू दलाई लामा यांना आमंत्रित केले होते. आणि पूज्य दलाई लामा यांनी सुध्दा निमंत्रण स्वीकारले होते. परंतु काही कारणास्तव धम्मपरिषद होवू शकली नाही, म्हणून धम्म परिषदेचे आयोजक मा.भी. डांगे आपल्या कार्यकर्त्यांसोबत वर्धा रेल्वे स्थानकावर जागतिक पूज्य धर्मगुरू दलाई लामा यांचे स्वागत करण्याकरिता पोहचले तेव्हा पुज्य दलाई लामांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना प्रशस्तीपत्र दिले़,
मा.भी. डांगे यांनी संपूर्ण आयुष्यात समाजाला धम्म संस्कारीत सुगंधित अत्तराचे जिणे दिले़,ग्रामीण भागातील प्रत्येक मुलं शिकले पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असायचा, धम्मकार्यासोबत शिक्षण प्रसारा वरही त्यांचा भर असायचा़ कारण त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत सविधान संस्कृतीला मानणारा समाज निर्माण करायचा होता, आणि त्यांच्या हयातीत ते बहुतांशी यशस्वीही झाले़ !
त्यांच्या या यशापाठीमागे त्यांच्या धम्मजीवनसहचारणी मातोश्री यशोदाबाई डांगे यांचा मोलाचा वाटा होता, म्हणूनच ते प्रत्येक वादळाला निर्भिडपणे सामोरे जाऊ शकले़. असे म्हणतात एक होता दिप ज्याने अगनिक दिप लावले़, या उक्तीप्रमाणे मा.भी. डांगे यांनी कठोर तेजस्वी परिश्रमातून धम्मभूमीचे बीजारोपण केले आणि त्याच बीजाचे आज महाकाय बोधिवृक्ष झाले. त्याची अमृतफळे धम्म, शिक्षण, संस्कार, त्याग आणि समर्पण संपूर्ण जग चाखत आहे. … आणि या समाजपयोगी चळवळीचा धम्म संस्काराचा वारसा त्यांचे धाकटे पुत्र विजय डांगे हे आज समर्थपणे चालवीत आहे.
….ज्याप्रमाणे बुद्धाचा धम्म जगाला कळाला धम्मनायक अशोक सम्राटांमुळे व त्यांच्या प्रसार आणि प्रचाराच्या नीतीमुळे़,त्याचप्रमाणे आपले वडील व आपले आदर्श तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणे त्यागमुर्ती आयु़.विजय डांगे यांनी सर्वप्रथम ‘नही वेरेन वेराणी’ या बुद्ध वचनाप्रमाणे त्यांनी प्रथम शत्रुलाही मित्र बनविले व सर्वांना सोबत घेऊन संस्थेला एका उच्च शिखरावर नेऊन पोहोचविले़, त्यांच्या निस्वार्थ कार्याला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरव केला, ते आजही शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करत आहे़, आयु़ विजय डांगे हे आपल्या वडिलांप्रमाणेच ध्येयवादी आणि शिस्तप्रिय आहेत़ यावरून असे म्हणावे लागेल,
‘जीवन जगता जीवन आहे
नाहीतर जीवन हे एक मरण आहे,
आता वादळही शमतात येथे, कारण
साथ मा़ भींच्या ‘विजयांची’ आहे
स्वार्थाला स्वार्थ जाळतो, पण निस्वार्थ
खरेपणा या धम्मभूमीमध्ये आहे….’
….आयु विजय डांगे यांनी भारतच नाही तर थायलंड, जपान सारख्या बौद्ध देशाचा दौरा करून तेथील शिस्तप्रिय संस्कृती आपल्याही येथे रूजावी म्हणून ते सतत प्रयत्नशील आहेत. आणि कोटंबासारख्या छोट्याशा गावाला जागतिक दर्जा मिळवून देणारे ते खरेखुरे भूमिपुत्र ठरतात ! अशी ही धम्म चळवळीसाठी जगणारी माणसं न्यारी. ….आज १० जून म्हणजेच मा.भी.डांगे यांचा स्मृतिदिन या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचार आणि कार्याला उजाळा देत पावन स्मृतीस धम्मभूमी परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादऩ..!
विनोद मा़.गुजर
तथागत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोटंबा
मो़ : ९८९०४२९३१४
More Stories
आईच्या दशक्रीयेच्या दिवशी चाळीस बोधीवृक्षांची लागवड करत, बौद्ध धर्म स्विकारला असल्याचे केले जाहिर, नाशिक मधिल लिंगायत परिवाराचे क्रांतीकारी पाऊल.
बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज
बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के तहत “प्राचीन बौद्ध पुरातत्व कार्यशाला” का ओनलाइन प्रशिक्षण