‘मी प्रथमत: भारतीय , अणि अंतिमत :भारतीय’
आयोजित जनता संपर्क अभियान शुभारंभ कार्यक्रम
मंगळवार दिनांक १८.१०.२०२२ रोजी सांय ६.०० वाजता
स्थळ :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह दादर (पुर्व) मुंबई ,
बांधवानो,
ओ.बी.सी. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मंडल आयोगाने सूचविलेल्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी दिवंगत पंतप्रधान मा. व्ही.पी.सिंग सरकारने जाहिर केले. त्याची अंमलबजावणी सर्व स्थरावर व्हावी म्हणुन आंबेडकर अनुयायी, पक्ष, संघटना रस्त्यावर उतरल्या, त्याच बरोबर प्रस्थापित ठेकेदारांनी आंबेडकरी आनुयायी कमंडलू यात्रेला विरोध करीत असल्याची आवई उठविली. त्यावर विश्वास ठेवून अंधभक्त ओ.बी.सी. बांधवानी, आंबेडकर आनुयायी, पक्ष, संघटनाच्या कार्यक्रमावर , कार्यकर्त्यावर दगड फेक केली. मंडल आणि कमंडलू ह्या दोघांमधला फरक त्यांना समजलाच नाही. तेवढा विचार आणि आकलन करण्याची क्षमता संस्कृतीच्या, व्यवस्थेच्या ठेकेदारांनी त्यांना येवू दिलीच नाही . एवढेच नाही तर स्वतंत्र भारतातील आपण स्वतंत्र नागरिक आहोत . ही ओळख सुद्धा ओ.बी.सी. बांधवांना आज पर्यंत होवू दिली नाही .
आज देशामध्ये सर्वत्र बोकाळलेला सांस्कृतीक दहशत वादामुळे हवेचे, आवाजाचे प्रदूषण वाढले आहे. ज्यामुळे मनुष्य प्राण्याचे जीवन धोक्यात आले आहे. एवढेच नाही तर मी भारतीय नागरिक आहे.ही ओळखसुद्धा माणुस विसरला आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मी ‘प्रथमत :भारतीय , आणि अंतिमत: भारतीय’ ही भूमिका घेवून प्रत्येक भारतीयाला जगण्याचा संदेश दिला आहे. राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्क आणि कर्तव्याप्रमाणे समता, स्वातंत्र्य आणि बंधूत्वाचे आनंदी जीवन प्रत्येक भारतीयाला जगता आले पाहिजे. परंतु वाढत्या सांस्कृतकि दहशत वादामुळे मनुष्य स्वतःची ओळख देखील विसरू लागला आहे. ही बाब देशहिताची नाही. देश असेल तर माणूस असेल. म्हणून ‘ मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय ‘ , हा संदेश अभियान कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आपण मोठ्या संख्यने हजर रहावे. ही विनंती.
🟠कार्यक्रम अध्यक्ष :-
आद. रमेश चक्रे साहेब. राज्य अधिकारी – कर्मचारी संघटना नेते तसेच ब्लू लाईन युनिटी असोसिएशनचे महासचिव
🟠 प्रास्ताविक;-
आद एन.डी.कांबळे साहेब, समाज कार्यकर्ते
🟠प्रमूख वक्ते :-
आद सयाजीराव वाघमारे साहेब, समाज भुषण ,चतुरस्त्र नेते
🔹एडव्होकेट ;- आद विश्वास कश्यप , कायदेतज्ञ, समाज नेते.
🔹 प्रा.डॉ.प्रतिभा ताई कांबळे
🔹 आयु मुकेश शिंदे, जेस्ठ पत्रकार
🟠 प्रमूख उपस्थिती:-
🔹 मा.अरविंद सोनटक्के
आयकर आयुक्त , सेवा निवृत, २२ प्रती.अभियान प्रमूख
🔹 मा. यशवंत गायकवाड
निवासी जिल्हा अधिकारी (से.नि.) बौध्द समाज नेते.
🔹 मा. ए.आर.कांबळे
आध्य्क्ष: नालंदा ट्रस्ट मुंबई.
🔶विविध संघटना व संस्थाचे मान्यवर पदाधिकारी
सुत्रसंचालन :-
🔸 आद. हेमंत मोकळ साहेब
प्रमूख कार्यवाहक
🔹 आयु विलास पवार
🟠 आयोजक:-
आयु विनोद साळवी, एड आयु भरत गायकवाड, आयु अशोक बाळ सराफ आयु शिवाजी गायकवाड , आयु अशोक नागकिर्ती , आयु विक्रांत पाटील, आयु सुरेश गायकवाड ,
आयु प्रकाश सोनावणे, आयु अनंत धनसरे, इंजि विश्वास तायडे,आयु अनिल पाडळे, आयु एड सुनिल साळवे, आयु सतिश काकडे ,आयु संजय घोडेकर आणि आयु अड प्रशांत गमरे
✨🔥🙏🔥✨💐✨🔥🙏🔥✨
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा