भारताच्या सर्वात प्राचीन ‘ धम्मलिपी ‘ चा शोध घेणाऱ्या जेम्स प्रिन्सेप यांची यावर्षी २२२ वी जयंती आहे . त्यांचा जन्मदिवस ‘ विश्व धम्मलिपी गौरव दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात येत आहे
जेम्स प्रिन्सेप १८१ ९ मध्ये जेव्हा भारतात आला तेव्हा तो २० वर्षांचा होता . जेम्स हाजॉनवसोफिया याचे १० वे अपत्य होते . १७७१ मध्य जेम्सचे वडील , जॉन यांनी भारतातील संधी पाहून आपल्या मुलांनाही भारतात पाठवले . वडिलांच्या ओळखीने जेम्सला कलकत्ता येथील टांकसाळीत ‘ अस्से मास्टर ‘ म्हणजे ‘ पारख करणारा म्हणून काम मिळाले . टांकसाळीत त्याने नवीन उपकरणांचा शोध घेतला . जेम्सने नाणे संशोधनावर भर दिला . जेम्सला ‘ जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी’चे संपादक करण्यात आले . मात्र जेम्स प्रिन्सेपची खरी ओळख जगाला झाली ती त्याच्या लिपी संशोधनामुळे बॅक्टरिया आणि कुषाण यांच्या इंडो – ग्रीक नाण्यांच्या अभ्यासातून त्याने खरोष्ठी या प्राचीन लिपीचा शोध लावला . त्याचा हा निबंध एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आणि संपूर्ण भारतातून लोकांनी त्याच्याकडे अनेक
शिलालेखांचे ठसे , नाणी , हस्तलिखिते पाठवून दिली . १८३७ मध्ये प्रथमच भारतातील शिलालेखांमधील अक्षरांचा शोध प्रिन्सेपने लावला . पुढे सम्राट अशोकांचे शिलालेख वाचताना त्यांच्या प्रत्येक वेळीस आलेला ‘ देवानांपिय पियदस्सिन ‘ हे कोणाला उद्देशून आहे हे कळत नव्हते . सतत सहा आठवड्यांच्या अथक प्रयत्नानंतर देवानांपिय पियदस्सिन म्हणजेच सम्राट अशोक असल्याचे प्रतिपादन प्रिन्सेपने केले . या शोधानंतर प्रथमच जगाला अशोक नावाच्या सम्राटाचे शोध लागला . जवळपास २२०० वर्षे अशोक नावाचा सम्राट या देशात होऊन गेला याचे कोणा गावीही नव्हते . प्रिन्सेपने शिलालेखांच्या अभ्यासाचा धडाकाच लावला . अतिपरिश्रमामुळे प्रिन्सेपला प्रचंड डोकेदुखीचा त्रास होऊ लागला . त्यांना इंग्लंडला हलविण्यात आले , मात्र २२ एप्रिल १८४० साली उण्यापुऱ्या ४१ व्या वर्षी प्रिन्सेपचे निधन झाले .
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात A.S.I. ची स्थापनेचे बीज प्रिन्सेपने रोवले होते . कलकत्तावासीयांनी त्यांच्या स्मरणार्थ हुगली नदीकाठी प्रिन्सेप घाट बांधला तर इंग्लंडमधे सरकारच्या वतीने त्यांच्या नावाचे मेडल बनविले . १७७ ९मध्ये पहिल्यांदा आलेल्या जॉन प्रिन्सेपनंतर प्रिन्सेप घराण्याच्या चार पिढ्यांनी भारतात वास्तव्य केले . नुकतेच जेम्स प्रिन्सेपच्या चौथ्या पिढीतील मुलाने जेम्स प्रिन्सेपचे जपून ठेवलेले सारे हस्तलिखितांचे पेटारे अभ्यासासाठी भारत सरकारच्या हवाली केले . भारतातील सर्वात प्राचीन असलेली सम्राट अशोकांची ‘ धम्मलिपी’चा शोध व भारतीय शिलालेखांचे गूढ उकलल्याबद्दल जेम्स प्रिन्सेप यांचा जन्मदिवस ‘ विश्व धम्मलिपी गौरव दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात येत आहे . जेम्स प्रिन्सेप यांना त्यांच्या २२२ व्या जयंतीबद्दल आदरपूर्वक नमन .
-अतुल भोसेकर , बौद्ध साहित्य प्रसारक मंडळ
More Stories
“मुंबई महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे ?” – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्ध विचार – अतुल भोसेकर
नालंदा – बोधिसत्वांची मांदियाळी : अतुल मुरलीधर भोसेकर