Introduction to Buddha Dhamma for students : पाश्चात्य देशातील वाढत्या समस्यांवर बुध्दधम्म हे एक शास्त्रोक्त उत्तर आहे. ही वस्तुस्थिती असल्यामुळे बुध्दधम्माकडे पाश्चिमात्य विचारवंत, अभ्यासक व अमेरिकन अभ्यासक आकर्षित झालेले आहेत.
अमेरिकेत शाळा, महाविद्यालये व विश्वविद्यालयातून बुध्दधम्म हा एक विषय म्हणून सध्या अभ्यासला जातो. थाई बौध्दांनी अमेरिकेत बुध्द्धविहारांची निर्मिती केलेली असून रविवारचे धम्म वर्ग तेथे घेतले जातात. अमेरिकन जनतेसाठी त्यांनी धम्मसेवा उपलब्ध करुन दिली आहे. स्वतः लेखक वटधम्म थाई बुध्द विहार, शिकागो येथे रविवारचे धम्मवर्ग घेऊन धम्मावर व्याख्याने देतात. १९८७ पासून लोकांची मागणी व आवड लक्षात घेता शिकागो येथे त्यांनी शाळा महाविद्यालये व विश्व विद्यालयातून व्याख्याने देण्यास प्रारंभ केला आहे.
धम्मविषय जनतेची आवड व वाढती गरज लक्षात घेता ह्या करिता बुद्ध धम्म परिचय विद्यार्थी करिता पुस्तकाची निर्मिती रविवारच्या धम्मवर्गासाठी व त्या वर्गास उपस्थित राहणाऱ्या सर्वांसाठी करण्यात आलेली आहे. साधारणतः बुध्दधम्म अमेरिकेत जपान, झेनचीन व तिबेट राष्ट्राकडून आत्मसात केला गेला आहे. थेरवाद प्रणालीतील सुलभ व सोप्या भाषेतील हे एक पुस्तक आहे. बुध्दधम्म म्हणजे निसर्ग नियम होय ज्यामध्ये चार आर्यसत्य व अष्टांगिक मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग सांगितलेला आहे.
आजच्या आधुनिक जगात बुध्दधम्म जीवनातील समस्यांना शास्त्रोक्त उत्तर सांगतो. त्यातील आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवण आपल्याला खरा मार्ग दर्शविते. आणि आपल्या समस्यांना उत्तर सांगते की मी कोण आहे ? माझ्या जीवनाचा उद्देश कोणता ? आणि मी कशासाठी जीवन जगतो ? जर आपण विवेकबुध्दीने व सचोटीने धम्माचा अभ्यास केला व धम्म आचरणात आणला. ध्यानभावना आंगिकारली तर मनःशान्ती आपल्यासोबत निश्चित वास करील.
बुद्ध धम्म परिचय विद्यार्थी करिता ह्या आवृत्तीमध्ये अनेक सुधारणा केलेल्या आहेत व अधिक माहिती टाकलेली आहे. आशा आहे की हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नसुन ज्यांना बुध्दधम्माविषयी आदर आहे व जे धम्माचे अभ्यासक आहेत त्यासर्वांसाठी तेवढेच उपयुक्त आहे.
सर्वजण शत्रुत्वासासून मुक्त असोत, सर्वजण वाईट वर्तनापासून मुक्त असोत. सर्वजण दुःखापासून मुक्त असोत.
सर्वजण आनंदी असोत.
May all beings be free from enmity. : सर्व प्राणी वैरमुक्त होवोत.
May all beings be free from all illtreatment : सर्व प्राणिमात्र सर्व दुर्व्यवहारांपासून मुक्त होवोत.
May all beings be free from suffering : सर्व प्राणी दुःखापासून मुक्त होवोत.
May all beings be happy. : सर्व प्राणी सुखी होवोत.
Dr. C. FengCham भन्ते. डॉ. सी. फँनचँम
१-१-१९९३
Introduction to Buddha Dhamma for students
More Stories
‘सम्यक वाचा’ अनुसरा आणि गोड बोला Mindful Communication is Sweet talk
परित्राण पाठ मराठी मध्ये Paritran Path in Marathi
बौद्ध धम्म प्रार्थना खमा याचना ( क्षमा याचना ), पंचसील याचना ( पंचशील याचना ) पाली आणि मराठी भाषेत