February 22, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील ध्वजारोहण करणार आहेत. ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्री राज्याला उद्देशून भाषण करतील. यामध्ये राज्याच्या प्रगतीच्या सध्याचे स्थितीवरती ते भाष्य करतील. स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना भवन येथे सकाळी 8 वाजता ध्वजारोहण होणार आहे.

सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती, तसेच अंगणवाड्या, शाळा, रुग्णालये यासह सर्व शासकीय संस्थांवर राष्ट्रीय ध्वज संहितेनुसार फक्त दिवसा ध्वज फडकवावा. म्हणजेच शासकीय कार्यालये आणि संस्थांना रात्री तिरंगा फडकविण्यास परवानगी नाही.’घरोघरी तिरंगा’ अभियानात मुंबईकरांनी गत वर्षी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे या वर्षी देखील मुंबईकरांनी या अभियानात सहभागी व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.

देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ गेल्या वर्षभरापासून साजरा करण्यात येतोय. आता हा महोत्सव समारोपाकडे वाटचाल करीत आहे. हे अभियान 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबविले जाणार आहे. या निमित्ताने ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियानाने अमृत महोत्सवाची सांगता होत आहे. या अभियानात शिलाफलकम, पंच प्रण (शपथ), वसुधा वंदन, वीरांना वंदन, ध्वजवंदन, मिट्टी यात्रा असे उपक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत.