विपस्सना विद्येच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्धांचा धम्म सम्पुर्ण विश्वात पोहचवणारे विश्व विपस्सनाचार्य श्री सत्यनारायण गोयंका गुरुजी यांनी त्यांच्या हयातीत दिनांक : 17/12/2011 रोजी विपस्सना सेवक संघाची स्थापना केली होती. हा “विपस्सना सेवक संघ” स्थापन करण्यामागची अनेक कारणे त्यांनी विदीत केली होती. त्यापैकी काही महत्वाची कारणे अशी विपस्सना विद्येचा प्रसार-प्रचार करणे, दिल्लीतील म्युझीयममध्ये ठेवण्यात आलेला भगवान बुद्धांचा अस्थिधातू कलश ग्लोबल पॅगोड्यामध्ये स्थापित करणे व विपस्सना विश्व विद्यापीठ व त्यांच्या इतर शाखांचे संरक्षण आणि संवर्धन करणे असा होता. या उद्देशपुर्ती करिता त्यांनी विपस्सना सेवक संघाचे माध्यमातून दिनांक: 23 व 24 मार्च 2012 रोजी इगतपुरी येथे दोन दिवसिय महाअधिवेशन देखील घेतले होते. परंतु, त्यानंतर थोड्याच कालावधीत म्हणजे, 29 सप्टेंबर 2013 रोजी त्यांचे निर्वाण झाले. तेंव्हा पासून विपस्सना सेवक संघाचे कार्य मंदावलेले आहे.
करिता, त्यांच्या उद्देश पुर्तीला पुन्हा गती देण्यासाठी रविवार दिनांक: 4 जुलै 2021 रोजी सकाळी 10:00 वाजता इगतपुरी येथील सुगत बुद्ध विहारात विपस्सना सेवक संघाच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सभेला संबोधित करण्याकरिता…
प्रमुख मार्गदर्शक- वंदनिय भन्ते ज्ञानज्योती महास्थविर विपस्सना सेवक संघाचे अध्यक्ष मा. गौतमजी गायकवाड़ साहेब
तसेच, इतर, सहा. आचार्य आणि मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी, सर्व विपस्सी साधक-साधीका व धम्म सेवक-सेवीका यांनी या सभेला आपला सहभाग नोंदवावा हि विनंती.
अध्यक्ष मा. गौतम गायकवाड़ संपर्क नं. (9833514619)
उपाध्यक्ष मा. भास्कर बर्वे (9225107644)
धम्मसेवक मा. वामन पवार (9987858595)
धम्मसेवक बी.आर. भोळे मा. (9867799465)
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?