April 2, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -२६

दहिरचा वध झाल्यानंतर तेथे मुस्लिम सत्ता स्थापन झाल्यावर तेथील बौद्धांची फारच निराशा झाली.अरब लोक त्यांचे अधिकार, विशेषाधिकार तथा सुविधा बद्दल उदासीन होते.एवढेच नव्हे तर नवीन शासन सत्तेत हिंदुशी योग्य व्यवहार करण्यात आला.या संकटातून मुक्ती प्राप्ती करण्या करिता एकमात्र उपाय होता.तो म्हणजे मुस्लिम धर्माचा स्वीकार.कारण की धर्मांतरित लोकांना मुस्लिम लोकांचे सर्व अधिकार ,विशेषाधिकार आणि सर्व सुखसुविधा सहजतेने उपलब्ध होऊ शकतात.म्हणून सिंधच्या बहुसंख्यांक बौद्ध लोकांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि ते मुस्लिम बनले.”

यानंतर प्रा. सेन एक महत्वपूर्ण गोष्ट सांगताना म्हणतात,

 ” ही काही अचानक घडलेली गोष्ट नव्हे की, पंजाब, काश्मीर, बिहारच्या आसपासच्या जवळील जिल्हे,उत्तर पूर्वजील्हे , जिथे, मुस्लिमांच्या सत्तेची स्थापना झाली. ते त्यापूर्वी ह्या भागातील शक्तिशाली बौद्ध केंद्रे होती. “

येथील बौद्धांनी , हिंदूच्या तुलनेत राजनीतिक प्रलोभनांना बळी पडून सहजतेने धर्मपरिवर्तन राजनीतिक प्रतिष्ठा आणि स्थिती प्राप्त करण्याकरिता केला असेल. असे म्हणणे देखील योग्य नाही.

ज्या कारणामुळे बौद्धांनी बौद्ध धम्म त्यागून मुस्लिम धर्माचा त्याग केला त्या कारणांचा अद्याप शोध‌ लागायचा आहे.ब्राम्हण राजा द्वारे बौद्धांचा छळ होणे एवढेच कारण याकरिता पुरेसे नाही.परंतु हे सुद्धा प्रमुख कारण असू शकते की ब्राम्हण राजा द्वारे बौद्धांचा छळ झाला असेल.आपल्याकडे बौद्धांचा छळ करणाऱ्या दोन राजांची उदाहरणे प्रमानासह उपलब्ध आहेत.

क्रमशः 

प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती