November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

समता सैनिक दलाचा इतिहास व वाटचाल

डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः  एकूण 8 संघटना स्थापन केलेल्या आहेत.
1) सर्वप्रथम बहिष्कृत हितकारणी सभा, मीटिंग दिनांक 9 मार्च 1924 आणि जाहीर घोषणा 20 जुलै 1924.
2) समता सैनिक दल – 13 मार्च 1927
3). समाज समता संघ, 4 सप्टेंबर 1927.
4) इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी 1936.
5) शेड्युल्ड कास्ट फेडरेशन 20 जुलै 1942.
6). बौद्धजन समिती.
7). भारतीय बौद्ध महासभा 4 मे 1955.
8). रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 30 सप्टेंबर 1956

‘ समता सैनिक दलाची स्थापना व वाटचाल ‘ –
1)13 मार्च 1927 रोजी समता सैनिक दलाची स्थापना डॉ.बाबासाहेबांच्या हस्ते , करण्यात आली……..19, 20 मार्च 1927 कुलाबा जिल्हा अस्पृश्य परिषद महाड , आणि तत्पूर्वीच्या व नंतर उद्भवणाऱ्या दंग्यांचा बंदोबस्त करणे आणि 25,26, 27 डिसेंबर 1927 चा महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह शिस्तबद्ध पद्धतीने संरक्षण करणे आणि यशस्वी करण्यासाठी मुंबईतील दगडी चाळीतील 15 तरुणांचे एक स्वयंसेवक दल डॉ.बाबासाहेबांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात स्थापन करण्यात आले होते. पुढे त्या दलाचे 50 स्वयंसेवक झाले नंतर 200 च्या पुढे स्वयंसेवक झाले आणि पुढे हेच स्वयंसेवक दल हे समता सैनिक दल म्हणून नावारूपास आले. (- भि.रा. आंबेडकर चरित्र खंड 3, लेखक चांगदेव खैरमोडे, पृष्ठ 123,178, 186.)
2)…….19 एप्रिल 1931 ला अखिल भारतीय अस्पृश्य पुढारी परिषद परळ मुंबई येथे भरविण्यात आली होती. त्यामध्ये सुद्धा वरील समता सैनिक दल हे शिस्त सांभाळत होते आणि संरक्षणाची बाजूसुद्धा सांभाळत होते. (- भी. रा. आंबेडकर चरित्र खंड 4, लेखक खैरमोडे, पृष्ठ 105.)
3) …..5.11.1931 समता सैनिक दलाची सत्याग्रहींची पहिली तुकडी मुंबईवरून नाशिकला पोहोचली (- डॉ. भी.रा. आंबेडकर चरित्र खंड 3, लेखक खैरमोडे पृ. 343.)
4)…….29 जाने. 1932 ला डॉक्टर बाबासाहेब दुसऱ्या गोलमेज परिषदेहुन वापस आले. त्यावेळेस त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी समता सैनिक दलाचे 3000 स्वयंसेवक हजर होते.
5)……7 मे 1932 ला कामठी- नागपूर येथे अधिवेशन होते, नागपूर रेल्वे स्टेशन वर बाबासाहेबांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी समता सैनिक दलाचे सैनिक बँडसह हजर होते.( – भि. रा. आंबेडकर चरित्र खंड 4, लेखक खैरमोडे, पृष्ठ 225, 254, 264.)
6)……. 8 जानेवारी 1933 ला एक अर्ज कमिशनर ऑफ पोलिस बॉम्बे ला लिहिण्यात आला होता, त्यामध्ये बँड पथकाचे पथसंचलन करण्यासाठी अनुमती मागण्यात आली होती. तेव्हा त्या पत्रावर/ अर्जावर एस एस डी चीफ डॉक्टर बी आर आंबेडकर, ऑनरेबल सेक्रेटरी ए. जी. शहाणे आणि समता सैनिक दल याऐवजी सोशल इक्वलिटी आर्मी असे लिहिन्यात आले होते. (संदर्भ- सोर्स मटेरियल vol i पृष्ठ 104, 105.)
7)……..18, 19, 20 जुलै 1942 नागपूर येथे ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस कॉन्फरन्स, डिप्रेस्ड women’s कॉन्फरन्स आणि समता सैनिक दलाचे कॉन्फरन्स भरवण्यात आले होते. त्यावेळी एस एस डी चे अध्यक्ष गोपाल सिंग पंजाब हे होते.( Vol 17 पार्ट 3 पेज 284, 285.) 8)…….ह्याच अधिवेशनात समता सैनिक दलाची घटना बनविण्यासाठी 5 लोकांची कॉन्स्टिट्यूशन कमिटी बनविण्यात आली होती. परंतु या कमेटीने दीड वर्षापर्यंत समता सैनिक दलाची घटना तयार केली नाही.
9)……पुढे 30, 31 जानेवारी 1944 ला कानपूर येथे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे आणि समता सैनिक दलाचे संयुक्त अधिवेशन भरविण्यात आले होते. ह्यात समता सैनिक दलाचे प्रेसिडेंट बी के गायकवाड होते. पुन्हा एक नवीन कमिटी समता सैनिक दलाची घटना बनवण्यासाठी गठित करण्यात आली आणि तिचे अध्यक्ष भाऊराव गायकवाड यांना निवडण्यात आले होते. ह्या कमिटीमध्ये इतर आणखी सहा मेंबर होते.
10)……. बाबासाहेबांच्या हयातीतच सन 1944 मध्ये समता सैनिक दलाची ही घटना बनवण्यात आली आणि त्यांच्याकडे दुरुस्ती किंवा संमतीसाठी पाठविण्यात आली होती.त्यास डॉ.बाबासाहेबांनी मंजुरी दिली .तेव्हापासून समता सैनिक दल त्याच्या घटनेनुसार कार्य करू लागले .
11)…… बाबासाहेबांच्या हयातीत समता सैनिक दल हे 1927 साली बहिष्कृत हितकारणी चे, नंतर इंडिपेन्डन्ट लेबर पार्टीचे, नंतर शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे स्वयंसेवक दल म्हणून कार्यरत होते.
तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नव्याने स्थापन केलेल्या राजकीय पार्टीची आघाडीची फौज म्हणून समता सैनिक दल कार्यरत राहील अशी डॉ.बाबासाहेबांची योजना होती.
12)…….14 ऑक्टोबर 1956 धम्मदीक्षा सोहळ्यात हजारो च्या संख्येने समता सैनिक दलाने स्वयंसेवकांचे कार्य केले.
अशी ही समता सैनिक दलाची सुरुवात आणि वाटचाल आहे.

13)……बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या/आरपीआयच्या नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची घटना संकलित, संपादित करून पुनर्लिखित केली आणि ती प्रकाशित केली.
……परंतु समता सैनिक दलाच्या नेत्यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनशी, RPI शी संबंध विच्छेद केला.
त्यामुळे समता सैनिक दलाच्या 1944 च्या घटनेनुसार कार्य थंडावले .दलाच्या कार्या कडे दुर्लक्ष केले .त्यामुळे दलाचे अस्तित्व हळूहळू कमी झाले .
आता तर समता सैनिक दलाची एवढी बजबजपुरी माजलेली आहे की ,ज्याला जसे पाहिजे, जसे सुचले तसे तसे त्यांनी आपापल्या घटना बनविल्या, आपापले ड्रेस कोड, झेंडे बनविले आणि समाजकारणामध्ये सुद्धा घाणेरड्या राजकारणा प्रमाणे गट निर्माण केले.या मुळेच बाबासाहेबांच्या चळवळीचा सर्व आघाड्यांवर सत्यानाश झाला ..म्हणून आता….
डॉ.बाबासाहेबांच्या काळात कार्यरत असलेले ,त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने चालणारे , त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेबांना अपेक्षित असलेले आणि त्यांनी दिलेल्या शिस्त व घटनेनुसार चालणारे….समता सैनिक दल निर्माण करणे हीच काळाची गरज आहे…..
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केले समता सैनिक दल पुन्हा उभे करणे हे आपले कर्तव्य आहे .हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन करीत आहोत

” समता सैनिक दलात सामील व्हा …..बाबासाहेबांचे संकल्प पूर्ण करण्याचा हाच एक मार्ग आहे.”
लक्षात ठेवा….समता सैनिक दल ही स्वतंत्र संघटना नसून ती बाबासाहेबांच्या विचारांच्या राजकीय पक्षाची आघाडीची फौज आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष पुन्हा प्रस्थापित करणे हेच समता सैनिक दलाचे ध्येय आहे.
म्हणून सर्व भारतीयांनी समता सैनिक दलात सहभागी व्हावे
” समता ,स्वातंत्र्य ,बंधुता व न्याय या तत्वांवर भारताची निर्मिती करणे आणि जातीव्यवस्था नष्ट करून बंधुभाव निर्माण करण्याचा डॉ.बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण करण्याचा व भारताला महाशक्ती बनविण्याचा तोच एकमेव मार्ग आहे.”

धर्मभुषण बागुल, राष्ट्रीय संघटक , समता सैनिक दल
9921323281
7020558011