|| आभाळा ऐवढी माणसं ||
|| त्यांच आकाशा ऐवढे कार्य ||
पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी १८४८ पासुनच बहुजन समाजात शिक्षणाचा प्रचार चालु केला होता• महात्मा फुले यांच्या शैक्षणिक चळवळीला काउंटर करण्यासाठी गोपाळ आगरकर व बाळ गंगाधर टिळकांच्या जोडीने शिक्षणक्षेत्रात काम चालु केले. १८८० मधे न्यु इंग्लिश स्कुल त्यांनी सुरु केले. तेव्हा सर जेम्स फर्ग्युसन हा ब्रिटिश अधिकारी १८८० ते १८८५ दरम्यान मुंबई इलाक्याचा गव्हर्नर होता. १८८० मधे स्थापन झालेल्या न्यु इंग्लिश स्कुलच्या उभारणीसाठी केलेल्या आर्थिक मदतीबद्दल डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या १८८४-८५ मधे सुरु केलेल्या कॉलेजला टिळक आगरकरांनी फर्ग्युसन यांचे नाव दिले. हे कॉलेज गद्रे आडनावाच्या व्यक्तीच्या जुन्या वाड्यात तसेच जागा मिळेल त्या ठिकाणी चालवुन त्यांनी शिक्षणप्रसार सुरू केला. परंतु यामध्ये अडचण येऊ लागली.
भांबुर्ड्यात (शिवाजीनगर) गावठाण परिसरात राजाराम शिरोळें पाटील यांच्या मालकीची बरीचशी जमीन असल्याचे आगरकरांच्या लक्षात आलं परंतु राजाराम शिरोळे पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा करण्यास आगरकर व टिळक टाळाटाळ करत होते त्यांचा ब्राह्मणी ईगो आड येत होता कारण टिळक अगरकर ठरले ब्राह्मण आणि राजाराम शिरोळे होते मराठा अर्थात ब्राह्मणांच्या भाषेत शुद्र कुनबी…….
शेवटी आगरकर १८८६ च्या दरम्यान राजाराम शिरोळे पाटलांशी संपर्क साधुन शिवाजीनगरला भेटायला गेले.
या भेटीत त्यांनी शिरोळे पाटलांकडे शिक्षणसंस्थेसाठी जमीन विकत द्यावी अशी मागणी केली. परंतु शिरोळे पाटील हे मराठा शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी जमीन विकत देण्यास नकार दिला. हवी तर भाड्याने देऊ शकतो अशी सुचना केली. पण टिळकांनी जमीन विकतच हवी असा अट्टाहास धरल्यामुळे शिरोळे पाटलांनी त्यांची मागणी धुडकावून लावली आणि पुढची सर्व बोलणी ठप्प झाली. आगरकरांची अडचण अजुनच वाढली.
कोल्हापुर संस्थानातुन रिजंट म्हणुन शाहु महाराजांचे वडील आबासाहेब घाटगे काम पाहत होते. कागल जहागिरीत त्यांनी जवळजवळ १४ शाळा स्वखर्चाने सुरु केल्या होत्या. शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे आगरकरांचा त्यांच्याशी संपर्क आलेला होता. टिळकांनी आगरकरांना शाहू महाराजांना भेटण्याचा सल्ला दिला.
१८९०-९१ मध्ये शाहू महाराज पुण्याला आले असताना आगरकरांनी त्यांना भेटुन ही अडचण सांगितली.
आगरकरांच्या विनंतीवरुन शाहु महाराज स्वतः
भांबुर्ड्या (शिवाजीनगर) येथील राहत्या घरी राजाराम शिरोळे पाटलांना भेटायला गेले. एवढा मोठा राजा आपल्या घरी आल्याचे पाहुन शिरोळे पाटलांना गहिवरुन आले. महाराजांनी आज्ञा करावी असा सुर शिरोळे पाटलांच्या बोलण्यातुन व्यक्त झाला. यावर महाराजांनी त्यांना विनंती केली की, टिळक आगरकरांना शैक्षणिक कार्यासाठी तुमची काही जमीन भाड्याने द्यावी. शिरोळे पाटील बोलले की, महाराज मी इथली जमीन कसतो,अनेक सर्वसामान्य लोक त्यावर उपजिवीका करतात. परंतु तुमचा मान म्हणुन मी या शैक्षणिक कार्यासाठी माझी जमीन भाडेतत्वावर द्यायला तयार आहे.शाहु महाराजांचा आदेश शिरसावंद्य मानुन राजाराम शिरोळे पाटील व त्यांच्या तीन मुलांनी १८९१ साली बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी नाममात्र दराने ९९ वर्षांच्या भाडेतत्वावर आपली ३७.५ एकर जमीन ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ला देण्याच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली आजही भारतात शैक्षणिक कार्यासाठी एवढी जागा देणारे एकही उदाहरण सापडत नाही.
आगरकर आण टिळकांच्या योजने नुसार जागेचा प्रश्न संपला होता. परंतु शैक्षणिक काम करण्यासाठी पैशांची चणचण जाणवु लागली. त्यामुळे पुन्हा एकदा आगरकर-टिळक जोडीने छत्रपती शाहु महाराजांना साकडे घातले. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता शाहु महाराजांनी ५००० रुपयांची मदत देऊन काम सुरु करण्यास सांगितले. एवढेच नाही तर संपुर्ण खर्चाची जबाबदारी उचलण्याची खात्री दिली. एवढे करुन शाहु महाराज थांबले नाहीत,तर तत्कालीन मुंबई चा गव्हर्नर जॉर्ज रॉबर्ट कॅनिंग हॅरिस याच्याशी संपर्क साधुन महाविद्यालय सुरु करण्यासाठी मान्यता द्यावी अशी विनंती लावुन धरली.
शाहु महाराजांच्या चिकाटीमुळे महाविद्यालयासाठी परवानगी मिळाली. त्यानंतर गव्हर्नर जॉर्ज रॉबर्ट कॅनिंग हॅरिस याच्या हस्ते १८९२ मधे इमारतीच्या पायाभरणीचा दगड रचण्यात आला.१८९४ ला शाहु महाराजांचा राज्यारोहण होऊन ते छत्रपती झाले. इमारतीचे काम १८९५ साली पुर्ण झाले.त्याच साली आगरकरांचे निधन झाले. इमारतीच्या पायाभरणीच्या खुणा आजही आपल्याला पहायला मिळतात. पुर्वी या महाविद्यालयाच्या जागी असणाऱ्या शिरोळे पाटलांच्या शेतीतुन वाहणारा पाण्याचा पाट आजही पहायला मिळतो. तसेच ऐतिहासिक एमपी थिएटरजवळ असणाऱ्या विहीरीमुळे भांबुर्ड्यातील (शिवाजीनगर) पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटत होता. ती विहिर आजही त्या ऐतिहासिक विहीरीचे दगड पहायला मिळतात
पुढे राजाराम शिरोळे पाटलांचे वंशज बाबुराव गणपतराव शिरोळे पाटील यांनी या महाविद्यालयात झुलॉजी (प्राणीशास्त्र) विभागामध्ये विभागप्रमुख म्हणुन काम पाहिले. पुढे सेवाज्येष्ठतेनुसार या महाविद्यालयाचे प्राचार्य तेच होणार होते परंतु (कुनबी शुद्राला प्राचार्य ? ) जुजबी कारण दाखवुन त्यांची ही संधी हिरावुन घेण्यात आली. राजाराम शिरोळे पाटलांचे नंतरचे एक वंशज *मालोजीराव शिरोळे पाटील यांनी याच महाविद्यालयात शिक्षण घेतले. या महाविद्यालयासाठी छत्रपती शाहु महाराज व आपल्या पुर्वजांनी दिलेल्या योगदानाची त्यांना पुर्ण माहिती होती. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत १९५८ मध्ये नेमका एक घडलेला किस्सा त्यांनी सांगितला. ज्या छत्रपती राजर्षी शाहु महाराजांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला,आर्थिक मदत केली त्याच शाहु महाराजांचा महाविद्यालयामध्ये लावलेला फोटो काही नतद्रष्ट लोकांनी काढुन टाकला. ही गोष्ट मालोजीरावांना समजली तेव्हा त्यांनी या कृत्याचा निषेध करुन या कृत्याविरोधात ठाम पावले उचलली. मालोजीराव शिरोळे,माजी मंत्री मधुकरजी पिचड,पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नानासाहेब शितोळे, पालांडे व शिवाजीनगर गावठाणातील तत्कालीन मराठा-बहुजन व मुस्लिम मंडळींच्या साथीने त्यांनी तत्कालीन प्राचार्यांच्या विरोधात आंदोलन केले.दोन वर्षांनंतर १९६० मध्ये प्राचार्यांनी या आंदोलनासमोर शरणागती पत्करली आणि इमारतीच्या रंगरंगोटीसाठी सदर फोटो काढला होता असे जुजबी कारण देऊन तो फोटो परत लावला. या ऐतिहासिक प्रसंगांची आठवण ताजी करताना आजही ७८ वर्ष वय असणाऱ्या मालोजीराव शिरोळेंना गहिवरुन येते
छत्रपती घराण्याशी असणारे भावनिक नाते त्यांनी आपल्या आचरणातुनही जपले आहे. म्हणुन शिवरायांचे आजोबा असणाऱ्या मालोजीराजे भोसले यांच्याप्रमाणेच त्यांनी आपल्या एका मुलाचे नाव शरीफजी असे ठेवले आहे.(शरिफजी शिरोळे पाटील )
असा हा फर्ग्युसन कॉलेजच्या सध्याच्या इमारतीचा इतिहास आहे. या इमारतीच्या बांधकामात शाहू महाराज व राजाराम शिरोळे पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. इथपर्यंत कुठेही टिळक, आगरकर इत्यादि लोकांविषयी अनादर केला गेला नाही. परंतु तरीही सध्याचे काही भिकार ब्रह्मवृंद शाहू महाराजांचा फर्ग्युसनच्या स्थापनेशी काय संबंध असे प्रश्न उपस्थित करुन आपल्या डोक्यातील शाहू द्वेष प्रकट करत आहेत. कदाचित ते त्यांचे संस्कार असावेत
असो !!!
२०१५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयास वारसा दर्जा मिळाला असताना सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया या महाविद्यालयात कोणकोण शिकले,कुणाचे योगदान मिळाले याचा गौरवपुर्ण उल्लेख करतात,पण खऱ्या अर्थाने ही वास्तु वारसा ठरण्यामागे मोलाचा वाटा असणाऱ्या राजाराम शिरोळे पाटील व छत्रपती राजर्षी शाहु यांचा विसर पडला आहे. आपल्या संस्थेवर या दोन महान व्यक्तींचे किती उपकार आहेत याची जाण संस्थेला राहिली नाही. म्हणुनच की काय या *महाविद्यालयाच्या जागेचे आजही कायदेशीर मालक असणाऱ्या शिरोळे पाटलांच्या घराण्यातील व्यक्तीला मॅनेजमेंट कोट्यातुन प्रवेश घेतानासुध्दा ब्राह्मणी अडीअडचणीचा आणि मनुवादि मानसिकतेचा त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रसंग पहायला मिळत आहेत.
फर्ग्युसन कॉलेजच्या सध्याच्या इमारतीच्या स्थापनेत शाहू महाराज आणि राजाराम शिरोळे पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणुन त्या कॉलेजची ओळख शाहू महाराजांच्या नावाने होत असेल तर कुणाच्या पोटात गोळा आला तरी चालेल कारण खऱ्याला मरण नाही.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहु महाराज व राजाराम शिरोळे पाटील यांचा पुतळा व संस्थेसाठी त्यांचे असणारे योगदान याची माहिती संस्थेच्या मुख्य प्रदर्शनीय भागात लावुन त्यांच्याप्रती निदान कृतज्ञता तरी व्यक्त करावी. जेणेकरुन भावी बहुजन पिढीला ज्यांच्यामुळे या वास्तुला वारसा दर्जा मिळाला व सरकारकडुन अनुदान मिळत आहे त्यांचे ॠण व्यक्त करता येईल•••••
More Stories
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.