त्रिरश्मी बुध्दलेणी वर्षावास समिती व नाशिकच्या समस्त उपासक उपासिका संघाच्या वतीने यावर्षी पुजनीय भन्ते अश्वजित(औरंगाबाद) यांना वर्षावासासाठी आमंत्रित करण्याचे सर्वानुमते निर्णय झालेला आहे.आपल्या सर्वांच्या वतीने धम्मविनयानुसार ज्येष्ठ उपासक व उपासिका भिक्खू संघाला याचना करून भन्तेजीना त्रिरश्मी बुध्दलेणी या ठिकाणी निवासी तिन महीने वर्षावास करण्यासाठी गूगल मिटद्वारे विनंती करून आमंत्रित करतील.तसेच या वर्षावास कार्यक्रमाचे तिन महिन्याचे नेमके स्वरूप कसे असेल,त्यासाठी नेमकी कशी तयारी करावी लागेल याविषयी देखील सविस्तर माहिती देण्यात येईल.
तरी नाशिक शहरातील सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक, राजकीय संघटना,संस्थेचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, उद्योजक,व्यावसायिक,नोकरदार,डॉक्टर्स असोसिएशन,बुध्द विहार कमिटी पदाधिकारी,महिला मंडळ प्रतिनिधी आणि समस्त बौध्द उपासक उपासिका आदी.तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया चे सर्व प्रतिनिधि यांनी ऑनलाईन मिटिंगला आवर्जून उपस्थित रहावे नियोजनाविषयी आवश्यक सूचना करून आपला देखील प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती.
सदर मिटिंगमध्ये खालील मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणे अपेक्षित राहील.
मिटिंगचे मुद्दे
1) वर्षावास कार्यक्रमाचे नेमके स्वरूप कसे असावे
2) आर्थिक नियोजन कसे करावे
3) वर्षावास नियोजन व्यवस्थापन कमिटी भोजन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था,टेक्निकलबाबी
4) सोशल मीडिया व प्रचार यंत्रणा प्रभावी राबविणे
5) शहरातील विविध परिसरातील बुध्दविहार कमिटीशी संपर्क साधणे
6) कार्यक्रमाची परवानगी घेणे
7) भिक्खू संघाला आमंत्रित करणे
8) ऐनवेळी चर्चेला आलेले विषय
निमंत्रक-त्रिरश्मी बुध्दलेणी वर्षावास समिती व समस्त बौध्द उपासक उपासिका संघ,नाशिक
To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/yyp-shmr-gzi
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला
संविधान जनजागर मंच आयोजित…. 3 रे जनजागृती संमेलन