डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि लर्नेट स्किल्स लिमीटेड यांच्या तर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि या प्रशिक्षणानंतर नोकरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही आणि त्यामुळे नोकरी मिळणे अवघड असते. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील अनुसूचित जातीतील विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. तसेच, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण मुंबई येथील उल्हासनगर, कळवा व अंधेरी या तीन केंद्रांवर घेतले जाणार आहे.
” अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणादरम्यान बार्टी संस्थेमार्फत दरमहा 4,000/- ते 6,000/- शिष्यवृत्ती “
बार्टी ही सामाजिक न्याय आणि मानवतावादी सहाय्य क्षेत्रातील एक स्वायत्त संस्था आहे. संघटनेच्या माध्यमातून आणि राज्यात
अनुसूचित जातीच्या प्रशिक्षणार्थींसाठी कौशल्य आवश्यकतेसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.
प्रशिक्षणार्थींच्या फायद्यासाठी सामंजस्य कराराद्वारे संपन्न झालेला हा सामंजस्य करार हा त्याचाच एक भाग आहे.
विकास कार्यकारी, प्रशिक्षणार्थी सहयोगी, ग्राहक संबंध व्यवस्थापन, मायक्रोफायनान्स संस्था असे प्रशिक्षण दिले जाईल.
प्रशिक्षण कार्याचे स्वरूप खालील प्रमाणे : खालील प्रकारे कोर्स असतील
१. ट्रेनी असोसिएट (रिटेल मॅनेजमेंट)
कमीतकमी १० वी पास
वयोमर्यादा – १८ ते ३५
केंद्र – उल्हासनगर/ कळवा
२. बिझिनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह ( बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स)
कमीत कमी ग्रॅज्युएशन/ पदवीधर
वयोमर्यादा – १८ ते ३५
केंद्र – उल्हासनगर/ कळवा
३. कस्टमर रिलेशनशीप मॅनेजमेंट ( बिझिनेस प्रोसेस आउटसोर्सिंग)
कमीतकमी १२ वी पास
वयोमर्यादा – १८ ते ३५
केंद्र – उल्हासनगर/ कळवा
४. मायक्रो फायनान्स एक्झिक्युटिव्ह
कमीतकमी १० वी पास
वयोमर्यादा – १८ ते २८
केंद्र – साकीनाका (अंधेरी)
प्रशिक्षणाचे इतर फायदे :-
१. इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण
२. व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण
३. संगणक व उद्योजकीय प्रशिक्षण
४. मोफत प्रशिक्षण साहित्य (पुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य, वही, पेन, इ.)
५. १०० % नोकरीची हमी
आवश्यक कागदपत्रे :-
१. जातीचा दाखला
२. आधार कार्ड
३. शैक्षणिक प्रमाणपत्र
४. रेशन कार्ड
५. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुकचे पहिल्या पानाची छायांकित प्रत
पात्रता निकष :-
१. केवळ अनुसूचित जातीतील प्रशिक्षणार्थी असावा
२. महाराष्ट्रातील रहिवासी
३. वयोमर्यादा १८ ते ३५
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- 30 सप्र्टेंबर 2023
बॅच सुरु होण्याचा दिनांक :- 9 ऑक्टोबर 2023
प्रशिक्षण स्थळ : उल्हासनगर सेंटर :–दुसरा मजला, सुयश कोचिग झलासेस वर, नवीन दबल्ल्डग, ब्लॉक नं.
141,चांगर बाबा नगर, मराठा सेझशन, उल्हासनगर 4, – 421 004
कळवा सेंटर :- 305, जानकी दवला, स्स्वचमग पूल जवळ, मनीर् नगर, गेर्ट नं.1, मुंबई-पुणेरोड,
कळवा, दजल्हा- ठाणे– 400 605
अंधेरी सेंटर :- लनेर्ट स्स्कल्स दलमीर्टेड, युदनर्ट नं.204,दुसरा मजला, सागर र्टेक प्लाझा, बी
चवग, साकीनाका, अंधेरी ईस्र्ट, मुंबई, 400072
संपर्क क्रमांक . :- +91 9767372010 ,9167989814
सविस्तर माहितीसाठी अधिकृत बार्टी संस्थेच्या संकेत स्थळाला भेट दयावी . : www.barti.in
अर्ज करण्यासाठी लिंक : https://rb.gy/u62gx
अधिकृत जाहिरात बघण्यासाठी खालील लिंक बघा
Check the link below to see the official advertisement
https://barti.in/upload/pdf/1695622088_learnet%20pdf_merged.pdf
Free skill development training for Scheduled Caste youth through Barti and Lanert Skill Limited
More Stories
2024-25 साठी परदेशात मास्टर्स आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या अभ्यासासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था NITCON Ltd संस्थेच्या वतीने मोफत प्रशिक्षण
CET Exam Registration : सीईटी नोंदणीसाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ ; सीईटीचे संभाव्य वेळापत्रक घोषित