May 30, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

फेब्रुवारी – february

बौद्धांचे महत्वाचे दिनविशेष ! डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष !

१ फेब्रुवारी

• १९२९ समतेसाठीच ही विषमता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अग्रलेख प्रकाशित.

• १९३० काळाराम मंदिर सत्याग्रहासाठी एक हजार स्वयंसेवकांनी नावे नोदविली.

• १९३२ दिल्लीत लोथीयन कमिटीची पहिली बैठक.

• १९३९ सुरभा नाना टिपणीस (महाड) यांचे विरुद्ध खटला दाखल.

• १९४७ संविधान सभेत मनुष्याचा व्यापार, वेठबिगार, अवयस्कांचे धर्मांतर यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.

• १९७७ भारतीय तटरक्षक दिन.

 

२ फेब्रुवारी

• १९१३ सुभेदार रामजी बाबा आंबेडकर स्मृतीदिन.

• १९२१ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडवरुन राजर्षी शाहु महाराजांना ब्राह्मणेत्तर चळवळीविषयी पत्र लिहीले.

• १९५९ मुकुंदराव आंबेडकर स्मृतीदिन.

 

३ फेब्रुवारी

• १९२८ सायमन कमिशनपुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष.

 

४ फेब्रुवारी

• १९३३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी यांची येरवडा (पुणे) भेट.

• १९५६ जनता ( साप्ताहिक ) ये प्रबुद्ध भारत असे नामांतर

 

५ फेब्रुवारी

• १९४७ दलित अत्याच्याराविरुद्ध संयुक्त राष्ट्राला निवेदन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

• १९५१ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू आचार संहिता बील लोकसभेत मांडले.

• १९५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महाबोधी सोसायटीच्या सभेत (दिल्ली) भाषण.

 

६ फेब्रुवारी

• १९३२ पूर्व खानदेशातील अस्पृश्यांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भुसावळ स्टेशनवर स्वागत व मानपत्र अर्पण.

• १९३९ सयाजीराव गायकवाड (बडोदा) स्मृतीदिन.

 

७ फेब्रुवारी

• १८९८ माता रमाबाई आंबेडकर जयंती .

• १९२० मजूरमंत्री डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे “पब्लिक वर्क्स अॅण्ड इलेक्ट्रॉनिक पॉवर” यावर दिल्ली येथे भाषण.

• १९३९ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाने ५ जागा जिंकल्या.

 

 

८ फेब्रुवारी

• १९२३ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंग्लंडवरुन मुंबईला आगमन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महारांच्या बलुत्या संबंधी मुंबईत जाहिर भाषण.

• १९३१ दादासाहेब गायकवाड यांनी कार्यकत्यांची सभा भरवून सत्याग्रहाच्या शुभारंभाचा दिवस ठरविला.

• १९३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मनमाड येथे जाहीर सभा.

• १९४४ स्त्री मजुराबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवेदन.

 

९ फेब्रुवारी

• सुभेदार रामजी बाबा आंबेडकर स्मृतीदिन.

• १८९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी देवराव विष्णू नाईक यांचा आलेवाडी (पालघर) येथे जन्म.

• १९२९ अमरावती (अर्नाळा ) लोकल बोर्डावर विहिरीचा सत्याग्रह.

• १९३३ राजनादगाव येथील विहिरीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर विहिर असे नाव दिले.

 

१० फेब्रुवारी

• १८४९ पुणे विद्यापिठाची स्थापना.

• १९३१ जिल्हाधिकारी गार्डन यांनी उपायुक्त कान यांना काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माहितीचे पत्र लिहिले.

• १९३८ डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोर्चा.

• १९९९ भारीप बहुजन महासंघाची परभणी येथे जाहीर सभा. (ओबीसींना मार्गदर्शक )

 

११ फेब्रुवारी

• १९३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अहमदनगर येथे भाषण.

• १९४३ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कागद पुरवठाविषयीचे भाषण, दिल्ली.

• १९४९ घटना समितीत वेठबिगार यावर भाषण.

 

१२ फेब्रुवारी

• १९३३ मंदिर प्रवेश विधेयकासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवेदन प्रसिद्ध.

• १९३८ मनमाड येथील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या परिषदेत भाषण.

 

१३ फेब्रुवारी
• १९३१ लंडनहून बाबासाहेब भारतात परत आले.

• १९३७ डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वाल्हे परिषद.

• १९४२ ‘व्हॉट कॉंग्रेस अॅण्ड गांधी ‘हॅव इन टूदी अनटचेबल्स’ ह्या ग्रंथाच्या लिखाणास प्रारंभ.

 

१४ फेब्रुवारी

• १८५४ भीमाबाई आंबेडकर यांचा जन्म मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे येथे झाला.

• १८५५ सावित्री ज्योतीबाच्या शाळेत चवथीत शिकत असलेल्या मुक्ता साळवे यांनी लिहिलेल्या निबंधात “आपण हिंदू नाहीत.” असे नमूद केले.

• १९२२ अखिल भारतीय बहिष्कृत परिषद.

• १९२९ बहिष्कृत भारत सेवा संघाचे वर्धा येथे वसतीगृह स्थापन.

• १९९९ भारिप तर्फे सम्यक विद्यार्थी आंदोलन.

 

१५ फेब्रुवारी

• १८९० हिंदू विधवांच्या केशवपणाविरुद्ध इंदूप्रकाश या वृत्तपत्रामध्ये जाहिरात.

• १९४९ मनमाड, जि. नाशिक येथे डॉ. आंबेडकरांचे जाहीर भाषण.

• १९५३ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंडो जपान महामंडळातर्फे नवी दिल्ली येथे भाषण.

 

 

१६ फेब्रुवारी

• १९२२  तिसरी अखिल भारतीय अस्पृश्य परिषद, राजर्षी शाहू यांच्या अध्यक्षतेत दिल्ली.

• १९३३  राजनादगाव येथील विहिरीस डॉ. आंबेडकर विहिर असे नाव दिले.

• १९३७ स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार बाबू हरदास एल. एन. यांनी प्रथम जयभीमचा नारा दिला.

• १९४९  मनमाड जि.नाशिक में डॉ. आम्बेडकर का जाहिर भाषण.

 

१७ फेब्रुवारी

• १९२० ब्रिटिश सरकारने डॉ. बी. आर. आंबेडकरांची मुंबई विधीमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली.

• १९३७ मुंबई प्रांतिक विधीमंडळासाठी घेतलेल्या निवडणूकीत स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मुंबईतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी झाले.

 

१८ फेब्रुवारी

• १९२७ डॉ. आंबेडकरांचा मुंबई विधी मंडळात शपथविधी

• १९३२ ठाणे जिल्हा बहिष्कृत परिषतेच्या अध्यक्ष पदावरुन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.

 

१९ फेब्रुवारी
• छत्रपती शिवाजी महाराज जयंती .

• १९३३ जागृती निर्माण करण्यासाठी नागपूरातील सर्व मोहल्यातून दलित फेडरेशनच्या जाहीर सभा.

 

 

२० फेब्रुवारी
• १८२७  क्रांतीबा ज्योतीबा फुले जयंती.

• १९२९  बहिष्कृत संघाच्या वतीने वर्धा येथे अस्पृश्यवर्गाची भव्य जाहीर सभा

• १९४६ बाबासाहेबांची मुलाखत घेण्यासाठी अमेरिका व इंग्लडहून पत्रकार.

• १९५० दि सिमेंट मार्केटिंग कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबईचे डॉ. बी. आर. आंबेडकरांना पत्र.

 

 

२१ फेब्रुवारी

• १९३९ डॉ. आंबेडकरांचे मुंबई असेंबलीत अंदाज पत्रकावर परखड भाषण.

• १९४८ घटना समितीच्या सदस्यांकडून घटनेचा मसुदा सादर.

 

२२ फेब्रुवारी

• १९४१ पहिली मांग, महार, वतनदार परिषद उस्मानाबाद येथे संपन्न.

 

२३ फेब्रुवारी

• १८७६  संत गाडगे महाराज जयंती.

• १९२४ मध्य प्रांत वन्हाड महार परिषदेचे अधिवेशन.

• १९३४ रामनवमीला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाबद्दल बाबासाहेबांचे मत विचारणारे दादासाहेब गायकवाडांचे पत्र.

• १९४१ वतनदार, महार, मांग परिषदेत लडवळे (ढोकी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.

 

२४ फेब्रुवारी

• १९२७ मुंबई  विधीमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थ संकल्पावर भाषण.

• १९५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “बुद्ध पूजापाठ” आणि “सुत्त” असलेली वंदनेचे पुस्तक प्रस्तावनेसह प्रकाशित केली.

 

२५ फेब्रुवारी

• दुसऱ्या गोलमेज परिषदेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर परतले.

• १९३५ हरिजन शब्दाला विरोध करण्याकरिता मध्य प्रांत सरकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निवेदन दिले.

 

२६ फेब्रुवारी

• १९३४ आकोट फैल, अकोला येते आंबेडकर दलित तरुण संघ स्थापन.

• १९४८- मसुदा समितीने भारतीय घटनेचा कच्चा मसुदा प्रकाशित केला.

 

२७ फेब्रुवारी

• माता भीमाबाई रामजी सकपाळ (आंबेडकर) स्मृतीदिन.

• १९३१ पहिल्या गोलमेज परिषदेत भाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईला परत आले.

• १९४७ देवळाली लष्करी न्यायालयापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.

 

२८ फेब्रुवारी

• राष्ट्रीय विज्ञान दिन.

• संत गाडगेबाबा जयंती (तिथीप्रमाणे)

• १९१८ राजषी छत्रपती शाहू महाराज यांनी बलुतेपद्धती रक्षाबाबत हुकूमनामा प्रसिद्ध.

• १९३२ मद्रास येथे अस्पृश्य, खिश्चन, मुसलमान, ब्राम्हणेतरांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत. 

 

Dinvishesh दिनविशेष,  बौद्धांचे महत्वाचे दिनविशेष ! डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष !