💁♂️ बौद्धांमधील अशिक्षित, सुशिक्षित, कार्यकर्ते, नेते, साहित्यिक, अध्यापक ही सर्वच मंडळी बरेचदा बुद्धाच्या तत्त्वाज्ञानाशी अत्यंत विसंगत भाषा बोलताना वा लिहिताना दिसतात. बौद्ध धम्मातील असे अनेक शब्द आहेत की ते अनेकांना ठाऊक नसल्यामुळे लोक शब्दांचा अपभ्रंश करताना दिसतात. यावर डॉ. यशवंत मनोहर यांनी सखोल लिखाण केले आहे.
डॉ यशवंत मनोहर यांच्या संदर्भात जाणून घेऊ या…
● तुम्हाला आठवत असेल की अलीकडेच विदर्भ साहित्य संघाच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा मानाचा ‘जीवनव्रती’ पुरस्कार एका प्रसिद्ध कवी व विचारवंताने नाकारला होता.
● कारण पुरस्कार वितरण समारंभात सरस्वतीची प्रतिमा ठेवली गेली होती. या ऐवजी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख किंवा इतर समाजसेविकांची प्रतिमा ठेवण्याची मागणी केली होती. हि तीच व्यक्ती आहे डॉ. यशवंत मनोहर.
● डॉ. यशवंत मनोहर हे बौद्ध धम्माचे व आंबेडकरी चळवळीतले एक गाढे अभ्यासक तथा विचारवंत आहेत.
● यशवंत मनोहर यांच्या कविता इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, बंगाली, कन्नड आदी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. तसेच त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी एका पुस्तकाची आपण माहिती घेणार आहोत.
🤔 काय आहे या पुस्तकात ?
🔹 जे काही शब्द बौद्धांच्या बोलण्या-लिहिण्यात सामान्यतः येतात त्या शब्दांचा मूळ बौद्ध धम्माशी काडीमात्र संबंध नसतो.
🔹 ईश्वर, आत्मा आणि यांच्याशी संबंधित अनेक शब्दरूपे बौद्धांच्या भाषेत न येण्यासाठी पर्यायी शब्दांची उत्तम मांडणी या पुस्तकात केली गेली आहे.
🔹 बौद्धधम्माचे लोक बुद्धिप्रामाण्यवादी आहेत. त्यांची भाषा त्यांच्या या तत्त्वज्ञानाशी सुसंगत, अंतर्विरोधविहीन असली पाहिजे.
🔹 पण बौद्धांच्या भाषिक व्यवहारात चैतन्यवादी धर्मपरंपरेतील अनेक शब्द येताना दिसतात.
🔹 हे शब्द फार नसतात पण हे शब्दही बौद्धांच्या भाषेला बुद्ध तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने विसंगत रूप देतात.
🔹 बुद्ध तत्त्वज्ञानाशी विरोधी शब्दांचे अर्थ, ते बौद्धांनी का वापरू नये याचे विवेचन आणि त्या शब्दांना पर्याय कोणता संभवतो अशा तीन टप्प्यांवर त्यांनी मांडणी केलेली आहे.
📖 पुस्तक वाचा : https://bit.ly/3CrxqOG
More Stories
“मुंबई महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे ?” – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्ध विचार – अतुल भोसेकर
नालंदा – बोधिसत्वांची मांदियाळी : अतुल मुरलीधर भोसेकर