डाॅ. बाबासाहेब आंबेडकर औद्योगिक संकुल (नियोजीत) निर्माणकरण्याविषयीची दिनांकश १६/१०/२०२२ रविवार च्या बैठकीचा इतिवृतांत
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर औद्योगिक संकुल (नियोजीत) निर्माण करण्याविषयीची बैठक दिनांक १६/१०/२०२२ रविवारी सुर्य किरण मंगल कार्यालय कल्याण पश्चिम येथे डाॅ. दिनकर आर. म्हसदे यांचे अध्यक्षते खाली झाली.
सदर बैठकीस ७० सदस्य हजर होते.
सदर बैठकीला खालील प्रमुख अतिथी व सदस्य हजर होते.
से.नि. न्यायमूर्ती अनिल वैद्य.
मा. शब्बीर अन्सारी राष्ट्रीय अध्यक्ष:- मुस्लिम ओबीसी, ऑर्गनायझेशन
मा. फाजिल अन्सारी :- राष्ट्रीय कार्याध्यक्ष आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन
मा. गोकुळ गायकवाड: उद्योजक
मा. अनील साळुंखे:
डाॅ. गुलाबराव वाघ: वरीष्ठ स्री रोग व प्रसुतीशास्र तज्ञ
मा. अरूण येशवंते: उद्योजक
मा. डी. व्ही. गवई : अध्यक्ष, भ्रष्टाचार निवारण समीती
मा. किशोर जाधव : उद्योजक
मा. दादाराव अटकोरे: से.नि.मुख्य कार्यकारी अधिकारी
डाॅ. सुधाकर शिंदे : सेनि. जिल्हा चिकित्सक
डाॅ. के.के. मोरे : सेनि. जिल्हा चिकित्सक
मा. तुकाराम माने : सेनि. इंजिनियर
मां. शांतीलाल कांबळे: सेनि. इंजिनियर
डाॅ. संजीवकुमार रत्नपूरकर: एम. एस. सर्जन
डाॅ. मिलिंद चिंचोलकर: एम.डी.पॅथाॅलाॅजी
डाॅ. राजेंद्र बच्छाव : सेनि. बीएमसी अधिकारी
मा. प्रियंका खंडाळे: अॅडव्होकेट.
मा. सतीश रामटेके: सी.ए.
मा. दिपक खरात: बॅन्क अधिकारी.
मा. एम.एम.कांबळे: सेनि. सह सचिव म.शा.
डाॅ. प्रशांत खरात: पुणे
मा. बाळासाहेब शिंदे: समाजीक कार्यारता.
मा. सुशिल शिंदे: BE Mech
मा. राणी जाधव: अध्यक्ष,सुनेत्रा महीला वि.प्रतिष्ठान
इतर मान्यवर: ५० सदस्य
उपरोक्त सर्व सदस्यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर औद्योगिक संकुल निर्माण करण्याविषयी त्यांचे विचार व्यक्त केलेत.
शासकीय संस्थाचे खाजगीकरणामुळे आरक्षणाच्या अंतर्गतच्या ९०% शासकीय नोकर्या समाप्त झाल्या आहेत.
त्यामुळे आपण काळाची गरज लक्षात घेऊन आपले औधोगीक व्यवसाय निर्माण करणे अत्यावश्यक झाले आहे.
आपले औधोगीक व्यवसाय निर्माण करण्यासाठी औधोगीक भुखंडाची प्रामुख्याने गरज असते.
म्हणून आपण औधोगीकीकरण साठी योग्य असलेल्या ठिकाणी औधोगीक भुखंड खरेदी करायला पाहिजे असे मत सर्वांनी व्यक्त केले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर औद्योगिक संकुल निर्माण करण्यासाठी योग्य असा औधोगीक भुखंड जिल्हा पालघर मधील तालुका वाडा च्या औधोगीक झोन मध्ये सुमारे २०० एकरचा सलग एक गट , भोगवटा वर्ग १, चा भुखंड शोधला आहे. सदर भुखंडाविषयीची सखोल माहिती या आधी आपल्याला दिलेली आहे. सदर भूखंडावर आपल्याला औधोगीक संकुल निर्माण करावयाचे आहे.
त्यासाठी अनुसूचित जात, जमाती, मुळ भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय , इतर अल्पसंख्याक , समविचारी समुह इत्यादी समाज समुहातील, आरक्षणाचे फायदे घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेल्या सदस्यांनी, एकत्रीत येऊन सदर २०० एकरचा औधोगीक भुखंड खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर औधोगीक भुखंड, औधोगीक संकुल निर्माण करण्यासाठी योग्य ठिकाण आहे असे मत सर्वांनी व्यक्त केले . सदर भुखंड घेणे हे एकट्या दुकट्याचे काम नाही.
हा भुखंड घेण्यासाठी २०० ते २५० सदस्यांची आवश्यकता आहे.
करीता, अनुसूचित जात व जमाती, मुळ भटके विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय व इतर अल्पसंख्याक व समविचारी समुहातील सक्षम सदस्यांची, सदर औधोगीक भुखंड खरेदी घेणार्यांची, यादी तयार करीत आहोत.
औधोगीक भुखंडाचे आपले फायदे:
१• सदर औधोगीक भुखंड आपल्या मालकीचा असेल.
२• भुखंडावर तुम्ही तुमच्या पद्धतीने औधोगीक व्यवसाय
सुरू करू शकता.
३• औधोगीक युनिट उभे करण्यासाठीच्या सर्व शासकीय परवानग्या मिळवून दिल्या जातील.
४• आपण आपल्या स्थावर मिळकतीवर Personal Bank Loan घेऊन सदर भुखंड विकत घेऊ शकता. भुखंड कोणत्या आर्थिक पद्धतीने विकत घ्यावा हा सर्वस्वी तुमचा वैयक्तिक भाग आहे. परंतु आपण एक एकरचा भुखंड नक्की घ्यावा ही आमची आपल्याल विनंती आहे.
५• भुखंड खरेदी नंतर, भुखंड तुमच्या मालकीचा झाल्यानंतर, त्या भुखंडावर औधोगीक युनिट निर्माण तथा उभे करण्यासाठीच्या शासनाच्या सबसिडीज शासनाचे नियमा प्रमाणे मिळतात. त्या सबसीडीज आपल्याला मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा मानस आहे. शासकीय सबसीडीज विषयीची सर्व माहिती प्लाॅट घेणार्याला प्रत्यक्षात दिली जाईल.
६• प्लाॅट खरेदीचे व्यवहार पुर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगपती तज्ञाकडून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. औधोगीक विकास साठीच्या शासकीय सबसीडीज मिळवून औधोगीक युनिट विकसित करून कार्यरत करता येतील.
७• औधोगीक युनिट मधुन निर्माण झालेले Products गरजू देशांमध्ये Export करण्याची यंत्रणा निर्माण केली जाईल. तसेच मार्केटिंग साठीची माहिती , मार्ग दर्शन व मदत केली जाईल.
८• तुमच्या औधोगीक भूखंडावर जर तुमचा वैयक्तिक औधोगीक प्रकल्प करावयाचा नसेल, तर त्या भुखंडाचे कमीत कमी एक लाख रूपये दर महा प्रमाने भाडे सहज आपल्याला मिळेल असी सभोवतालची परीस्थिती आहे.
९• सदर २०० एकर भुखंडावर आपण सामुहिक पद्धतीने व्यवसाइक वैद्यकीय महाविद्यालय त्याला सलग्न असलेले अद्यावत रूग्णालयात, इतर शैक्षणिक संस्था इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प देखील आपल्याला निर्माण करता येतील.
१०• आपत्कालीन वेळेला सदर २०० एकर भूखंड समाजाच्या आपत्कालीन समुहाला मोठा आधार होऊ शकतो हे सर्वांनी गांभीर्याने लक्षात घ्यावे.
११• भविष्यात काही कारणास्तव भूखंड विकण्याचे झालेच तर त्यावेळी त्या भुखंडाची किमंत दुप्पट तिप्पट दराने मिळेल.
१२• भुखंड खरेदीचे व्यवहार पारर्दशकतेने केले जातील. तुमच्या एक रुपयाचा गैरव्यवहार होणार नाही.
म्हणून सदर औधोगीक भुखंडाची आर्थिक गुंतवनुक ही सर्व दृष्टीने आपल्याला उपयुक्त व फायदेशीर राहील.
उपरोक्त सर्व बाबींचा आपण गांभीर्याने विचार करून कमीत कमी एक एकर औधोगीक भुखंड आपण घ्यावा असी आम्ही आपणास पुन्हा विनंती करीत आहोत.
आम्ही, भुखंड घेणार्या सदस्यांची यादी तयार करीत आहोत. करीता इच्छुक सदस्यांनी भुखंडाचे अपेक्षीत क्षेत्र विकत घेण्याविषयीची माहिती खालील सदस्यांना त्यांच्या व्हाॅट्सअॅपवर मेसेज मार्फत लवकरात लवकर कळवावे ही नम्र विनंती.
१• डाॅ दिनकर आर म्हसदे. मो.नं. : 9821865322
२• मा. दादाराव अटकोरे. मो. नं.: 9273551777
३• मा. डाॅ. के.के. मोरे. मो. नं.: 9372366647
४• मा. शांतीलाल कांबळे. मो.नं.: 9987470754
५• मा. प्रियंका. मो. नं. : 9370645349
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर औद्योगिक संकुल निर्माण सदस्यांतर्फे….
More Stories
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा
व्हिएतनाम बौद्ध संघाने दलाई लामांची भेट घेतली, व्हिएतनाममध्ये वेसाक उत्सवाचे निमंत्रण दिले
भारतीय बौद्ध महासभा – नासिक जिल्हा, तालुका पदाधिकारी नियुक्त समारंभ