February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

तथागत पारमिता संघ महाराष्ट्र द्वारे 1 एप्रिल पासून प्रवचन मालिका सुरू

☸️तथागत पारमिता संघ महाराष्ट्र☸️ द्वारे आयोजित
बोधिसत्व,विश्वरत्न व सर्व समाजाचे उद्धारकर्ते सर्वांचे तारणहार,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तथागत पारमिता संघ महाराष्ट्र द्वारे 1 एप्रिल पासून प्रवचन मालिका सुरू करीत आहोत🌹🙏🌹🙏🎊🌹🎊🌹🎊
🌹🙏नमो बुध्दाय,जयभीम🌹🙏
सर्व समाजातील बांधवांना कळविण्यात येते आहे की,ज्या महामानवाने सर्व बहुजन समाजातील लोकांना मनुस्मृतीच्या विकृत अंधश्रद्धेत फसलेल्या मानसिक महाभयंकर परिस्थितीतुन बाहेर काढले,आणि अतिशय परिश्रम घेऊन सर्वांना त्या असह्य वेदनेच्या ज्वालातुन मुक्त केले
आणि बुद्ध,धम्म व संघ रत्न आपल्या सर्वांच्या झोळीत टाकून समाजातील लोकांवर खूप मोठी अनुकंपा करून धम्माची अमृत वर्षाव केली आहे.🙏 🎊🌹🎊🌹🎊🌹🎊
समाजातील लोकांना त्यांचे न्याय,हक्क,अधिकार काय आहे हे संविधनात लिहुन ठेवले,व ते मिळवून देण्यासाठी त्यांना किती कठीण परिस्थितीचा सामना व यातना सहन कराव्या लागल्या असतील,ह्यांचा आपण सर्वांनी विचार करावा
आणि म्हणुनच त्यांनी लिहिलेल्या संविधानाची रक्षा करून आपण सर्वांनी एकत्रित येऊन पुढाकार घेऊन बाबासाहेबांनी आपल्या सर्वांवर केलेल्या अनंत उपकाराची,अनंत ऋणानुबंध जाणीव ठेवून संविधानाची रक्षा करुया🙏
बाबासाहेब आजारी असुन सुद्धा त्यांनी स्व:ताकडे लक्ष न देता अतिशय परीश्रम घेऊन एकट्यांनी ते संविधान लीहीले आहे, आणि भारतीय घटनेचे ते एकमेव शिल्पकार झाले,घटनेत त्यांनी कुणासाठी काय काय?अधिकार दिले आहे.ते सर्व तळागाळातील लोकांना समजावे,त्यांच्या पर्यंत ते जावे, व सर्वांनी ते जाणून घेण्यासाठी आपण 1एप्रिल पासून मालिकेद्वारे संवीधाचा प्रचार,प्रसार करणार आहोत तरी सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांनी संविधान म्हणजे काय आहे? त्यात बाबासाहेबांनी कुणाला काय हक्क अधिकार दिले आहेत,हे जाणून घ्यावे ही मैत्री पुर्ण नम्र विनंती करीत आहोत आपण हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक आहे
बाबासाहेबांच्या जयंती निमित्त त्यांनी केलेल्या महान कार्याची त्यांच्या त्यागाची,बलिदानाची, समाजाच्या भल्यासाठी त्यांनी केलेले समर्पण काय आहे ह्यांची माहिती सर्वांना कळावी हा आमचा एकमेव मुख्य उद्देश,ध्येय आहे,आणि हीच आमची खरी बाबासाहेबांची जयंती आहे असे आम्ही मानतो,व समजतो🙏

तरी सर्व समाजातील ज्या मान्यवरांना बाबासाहेबांच्या कार्याची जाणिव आहे.ज्यांचे बाबासाहेबांच्या पुस्तकांचे वाचन आहे,गाढा अभ्यास आहे. आणि ज्यांचे व्याख्यान लोकांना सहज समजेल असे सरळ साध्या,सोप्या भाषेत आहे,अशा वक्त्यांना आम्ही तथागत पारमिता संघाद्वारे जयंती निमित्त प्रवचन मालिकेसाठी आमंत्रित करीत आहोत.
तरी मान्यवरांनी आमचे आमंत्रणाचा स्विकार करून आम्हाला मोलाचे सहकार्य करावे,ही अपेक्षा करुन मैत्रीपूर्ण नम्रपणे विनंती करीत आहोत.🌹🙏🌹🙏🌹🙏
तरी ह्या मालिकेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांनी आपले शुभनाव जाहीर करावे,व खालील नंबर वर लवकरात लवकर आपले नाव देण्याची कृपा करावी
🙏🌹धन्यवाद🌹🙏
आपल्या सर्वाची कल्याणमित्र
तथागत पारमिता संघ महाराष्ट्र
धम्म सेविका
प्रणाली बागडे
7208304712