November 26, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

वेरूळ कार्यशाळेत राज्यभरातुन धम्मलिपि अभ्यासक हजर

दान पारमिता फाउंडेशन अंतर्गत MBCPR team तर्फे वेरूळ बुद्ध लेणी येथे २४ व्या एकदिवसीय कार्यशाळेचे निशुल्क पध्दतीने आयोजन करण्यात आले होते,

ह्या कार्यशाळेत बीड , परभणी, मुंबई, नाशिक, नागपूर, जालना, बुलढाणा, नांदेड, कर्नाटक, अकोला, धुळे, जळगाव आदी ठिकाणाहून २०० च्या आसपास अभ्यासक आले होते,
संस्थेच्या माध्यमातून धम्मलिपि व कार्यशाळा निशुल्क पध्दतीने राबवण्यात येतात,

ह्या कार्यशाळेत प्रामुख्याने धम्मलिपि व लेणी अभ्यासक मोठ्या प्रमाणावर होते,
ह्या कार्यशाळेत सर्वप्रथम लेणी क्रमांक १० चैत्यगृहामध्ये सामूहिक त्रिसरण पंचशील घेण्यात आले,
त्यानंतर सूत्रसंचालन कविता खरे यांनी केले,
दान पारमिता फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या कार्यशाळाचे स्वरूप व व्याप्ती व जनजागृती का करावी ह्याचे महत्त्व संस्थेचे अध्यक्ष सुनील खरे यांनी समजावून सांगितले,

यावेळी लेणी समजून घेण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय पाईकराव हे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते,
यावेळी शिल्पकलेचा आविष्कार असलेल्या ह्या लेणी समूहातील बोधिशक्ती शिल्प, महामयुरी शिल्प, जांभाल शिल्प, हरिती यक्षिणी शिल्प, विद्याधर, बोधिसत्व पद्मपाणी, बोधिशक्ती पद्मपाणी, बोधिसत्व वज्रपाणी शिल्प, तसेच तीन मजली असलेल्या विहारास थेरवाडा किंवा राजवाडा का म्हटले गेले हेही ह्यावेळी सविस्तर समजावून सांगण्यात आले,
भोजनाची व्यवस्था दान पारमिता फाउंडेशनच्या माध्यमातून सचिन खरात अमोल बोर्डे व स्वप्नील मगरे ह्यांच्या तर्फे करण्यात आली होती,
तसेच मुंबई, नाशिक येथील उपसकांची राहण्याची व्यवस्था देखील औरंगाबाद येथील विहारात औरंगाबाद टीम तर्फे करण्यात आली होती, यावेळी मूव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्हज प्रिझर्व्हेशन व रिस्टोरेशनचे सुनील खरे, प्रविण जाधव, विजय कापडणे, कविता खरे , गौतम कदम, विकास खरात, शशिकांत निकम, इत्यादी प्रमुख एडमीन पॅनल उपस्थित होते,
तसेच ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अनेक पडद्याआड असलेले बांधव महत्वपूर्ण योगदान देत होते म्हणून ही कार्यशाळा उत्तमरीत्या पार पडली,
यावेळी सुजाता मोरे, तेजस जोगदंड, संतोष वाघमारे, राजेंद्र दाभाडे, पांडुरंग सरकटे, डॉ म्हस्के, मनोज दाभाडे, अनुराधा गाडेकर, दिलीप वासनिक, सुरेश कांबळे, निरझरा रामटेके, प्रणाली लुटे, अलका गवई, सुजाता मोरे , शिवदास दोंदे , अनामिका हाडके, शिला पाटील, रवींद्र पाटील, मनोज दाभाडे किरण केदारे, पद्माकर गवई, व प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अभ्यासक उपस्थित होते.