महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर , १९५६ रोजी हिंदु धर्माचा त्याग करून मानवतावादी व विज्ञानवादी बौध्द धम्माचा स्विकार केला आहे . तसेच राज्यघटनेमध्ये ओबीसीसाठी ३४० कलम ( ३४० जाती ) , एस . सी . साठी ३४१ कलम ( ५९ जाती ) व आदिवासीसाठी ३४२ कलम ( ४२ जाती ) ची तरतूद करून महाराष्ट्रातील एकूण जवळपास ४५० जातींना सामाजिक , राजकीय , शैक्षणिक व आर्थिक आरक्षणाचा फायदा मिळवून दिला आहे . त्यामुळे त्यांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात उंचावले असून ही सर्व किमया डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचीच असल्यामुळे या समाजाचे तारणहार , मार्गदाता व मुक्तीदाता केवळ बाबासाहेबच आहे . म्हणून , त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हिंदू धर्माचा त्याग करुन हजारो चर्मकार समाजबांधव हे तथागथाचा मानवतावादी व विज्ञानवादी बौद्ध धम्माचा स्विकार करणार आहे , त्यासाठी दि . १४/१०/२०२२ रोजी धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . सदरील धम्मदीक्षा सोहळा हा सर्वांसाठी खुला आहे , असे आवाहन श्रावण गायकवाड यांनी केले आहे . ज्यांना ज्यांना बौध्द धम्माची दीक्षा घ्यावयाची आहे , त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क करुन नाव नोंदवावे . सचिन निकम- मो . ९२७००४९४५८ , प्रविण बोर्डे- मो .८१८००००७७७ सत्यजित गायकवाड- मो . ८४२१३७८४८७ , राहुल भालेराव- मो . ७७२१०६०६७० विजेंद्र टाक- मो . ९८८१४११६१२ , महेश निनाळे- मो . ९४२२७२१३१२ तसेच , दि . १४/१०/२०२२ रोजीचा धम्मदीक्षा सोहळा यशस्वी करण्यासाठी नियोजन समिती व प्रचार समितीची स्थापना करण्यात आली आहे . मुख्य संयोजक – मिलिंद दाभाडे ( मा . विरोधी पक्षनेता , मनपा , औरंगाबाद )
नियोजन समिती- कैलास गायकवाड , किशोर गडकर , अॅड . धनंजय बोर्डे , वसंतराज वक्ते , संतोष मोकळे , आनंद लोखंडे , किशोर खिल्लारे , अनिल सदाशिवे , सुरेश शिंगारे , चंद्रकांत रुपेकर , महेश तांबे , अनिल मगरे , सचिन निकम , दिपक निकाळजे , मधुकर चव्हाण , बलराज दाभाडे , संदिप जाधव , मनोज वाहुळ , अरविंद कांबळे , प्रांतोश वाघमारे , गुणरत्न सोनवणे , राष्ट्रपाल गवई , मनिष नरवडे , मिलिंद बनसोडे , सतिश नरवडे , रामदास ढोले , अरुण वासनकर , संजय जाटवे , सचिन गंगावणे , भिमराव भुजंग , कमलेश चांदणे , विनोद साबळे , विनोद कासारे , राहुल भालेराव , विजेंद्र टाक . प्रसार समिती- अॅड . भंन्ते बुध्दपाल , बाळुभाऊ गंगावणे , श्रीरंग ससाणे , प्रा . सिध्दोधन मोरे , गौतम गणराज , बालाजी सुर्यवंशी , ज्ञानेश्वर खंदारे , सर्जेराव मनोरे , रतनकुमार साळवे , आनंद कस्तुरे , अनिल ढाले , प्रा . विलास पठारे , किशोर जोहरे , अशोक कांबळे , अंजन साळवे , प्रविण नितनवरे , संजय सातपुते , रणजित साळवे , प्रविण बोर्डे , मदन भगुरे , शांतीलाल लसगरे , सचिन बनसोडे , बाळुभाऊ वाघमारे , विशाल मोरे , शांतीलाल दाभाडे , मिलिंद दाभाडे ( घाटी ) , संजय म्हस्के , नितीन दाभाडे , लक्ष्मण हिवराळे , अॅड.डी.व्ही.खिल्लारे , प्रकाश गायकवाड , मुकेश खोतकर , मुकूल निकाळजे , कपिल बनकर , सोनू नरवडे सदरील कार्यक्रमास आंबेडकरवादी व परिवर्तनवादी चळवळीतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येवून त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धम्मदीक्षा सोहळा संपन्न होणार असल्याचे श्रावण गायकवाड यांनी सांगितले आहे . यावेळी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते रतनकुमार पंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती . तर पत्रकार परिषदेला बाळु गंगावणे , वंसतराज वक्ते , राहुल साळवे , गौतम गणराज , संतोष मोकळे , श्रीरंग ससाणे , विश्वनाथ दांडगे , रतनकुमार साळवे , आनंद लोखंडे , आनंद कस्तुरे , किशोरभाई खिल्लारे , सिध्दोधन मोरे , सचिन निकम , दिपक निकाळजे , मनोज वाहुळ , अरविंद कांबळे , संदिप जाधव , ज्ञानेश्वर खंदारे , प्रकाश कांबळे , चंद्रकांत रुपेकर , सतिश नरवडे , मधुकर त्रिभुवन , बाळु वाघमारे , उत्तम जाधव , सुनिल खरात , गुणरत्न सोनवणे , सुनिल खरात , राहुल जाधव , संजय जाटवे , राहुल भालेराव , भगवान तरटे , गणेश गरंडवाल , नवल सुर्यवंशी , कपित बनकर , किशोर ससाणे , रमेश वानखेडे , विकास हिवराळे , रविंद्र वाघ , मनिष बोर्डे , विजयराज पवार , शुभम पांढरे , विशाल कांबळे , सुनिल पांढरे , भाऊसाहेब जोशी , आदी उपस्थित होते .
More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा