भारतात ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ हा साजरा केला जाणारा बौद्ध धर्मियांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे, धम्मचक्र प्रवर्तन दिन. दरवर्षी स्वाभिमानी आंबेडकर अनुयायी हा सण 14 ऑक्टोबर किंवा विजयादशमी दिवशी साजरा करतात.
भारतात ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ हा साजरा केला जाणारा महत्वाचा उत्सव आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातील लाखो अनुयायी या दिवशी नागपूरला येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर इथं आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. म्हणून हा दिवस ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, या निमित्तानं आपण ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’चा इतिहास जाणून घेऊया.
धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचे महत्व
सम्राट अशोका यांनी इसवी सन पूर्व तिसर्या शतकामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत 1956 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर तारखेला नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर सुमारे 5 लाख अनुयायींसोबत डॉ. आंबेडकरांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली.
बौद्ध धर्मियांसाठी 14 ऑक्टोबर हा दिवस खास आहे, कारण हा दिवस अनेकांना बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे. अशोक विजयादशमीचं औचित्य साधत 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पाच लाखांपेक्षा जास्त अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता.
बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केलं म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी, नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात. 2 ऑक्टोबर 2006 रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशांतील 10 लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन 1957 पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात.
धम्मचक्र प्रवर्तन दिन २०१० साला पासून प्रत्येक बुद्ध विहारामध्ये साजरा केला जातो तसेच सर्व बौद्ध बांधव एकत्रित येऊन बौद्ध भिक्खूंचे प्रवचन कार्यक्रम त्याच दिवशी ठेवतात आणि बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य मोठ्या जमाने केले जाते गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण भारतामध्ये बुद्ध विहार निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भिकू संघाच्या धम्मपद यात्रही भारतात होत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेच्या जातीयतेच्या विळख्यातून समानतावादी बुद्ध धम्म धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अशोका विजयदशमी दिवशी स्वीकारला, धम्मचक्र प्रवर्तन दिन ऐतिहासिक दिनाचे महत्त्व लक्षात घरवून लाखो बांधव भारतात मोठ्या प्रमाणात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करतात.
Buddhism | Buddhist Bharat | Dhammachakra Pravartan Din
More Stories
Dhamma Dhwaj Vandana धम्म ध्वज वंदना
Dr. Babasaheb Ambedkar Social Contribution डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान
महामानवाचा शेवटचा संदेश व अखेरच्या काळातील खंत! Nanak Chand Rattu