February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

धम्मभूमी लोकार्पण सोहळा : गुगवाड, सांगली

धम्मभूमी लोकार्पण सोहळा – गुगवाड, सांगली येथे दिनाक १२ / ११ /२०२२ रोजी शनिवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५  वाजेपर्यंत असेल
समस्त बौद्ध अनुयायांना विनंती महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेलगत सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ‘गुगवाड ‘या गावी आयुष्यमान चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर या बौद्ध अनुयायाने बारा एकर परिसरामध्ये स्वखर्चाने सुमारे 13 कोटीचे भव्य ‘बुद्ध विहार’ बांधले आहे .या कार्यासाठी सरकारकडून अथवा कोणत्याही अनुयायाकडून एकही पैसा देणगी घेतलेली नाही .तेथील परिसरामध्ये पण काही भंतेजींची कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यांच्यासाठी पाच एकर जागेत आंबा ,चिकू ,केळी ड्रॅगन फूड इत्यादी फळांची झाडे लावण्यात आली आहेत. तसेच तेथे विपश्यना केंद्र ही बांधण्यात येणार आहे. बालक आणि बालिका यांच्यासाठी धम्म शिबिर प्राध्यापक अशोक भटकर सर चालवीत आहेत .दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी पाचशे भंतेजींच्या उपस्थितीत या विहाराचे लोकार्पण होणार आहे त्यासाठी भव्य मंडप उभारण्याचे कामही चालू आहे काही लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच कर्नाटक व महाराष्ट्राच्या आसपासच्या परिसरातील लॉज बुकिंग करण्यात आली आहेत. पंधरा हजार शुभ्र साड्यांचे वितरण आसपासच्या महिला भगिनींसाठी करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या या भव्य बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याला परदेशी भन्तिजी सुद्धा येण्याची शक्यता आहे तरी अशा या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ही विनंती.

दीपस्तंभ सांस्कृतिक संघ, श्रावस्ती बौद्ध विहार, लुम्बिनी बुद्ध विहार, सांगली

संपर्क : डॉ. जगन कराडे

अध्यक्ष :    दीपस्तंभ सांस्कृतिक संघ ९८५००२७२०७

Dhammabhumi Dedication Ceremony