• चला, चला, चला दीक्षाभूमि, नागपुर ला चालला….
दिनांक : १३ जानेवारी २०२३
वेळ : सायंकाळी ६:०० वा.
स्थळ : दीक्षाभूमि, नागपुर
: विशेष अतिथी : भंते विनय रक्खिता (अलोका ट्रस्ट, बंगलौर)
: मुख्य अतिथी : डॉ. हर्षदीप कांबळे (प्रिंसिपल सेक्रेटरी, उद्योग-ऊर्जा
आणि कामगार विभाग)
डॉ. सुधीर फुलझेले (सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमि, नागपुर )
: सांस्कृतिक समारोह
विदर्भ के छोटे उस्ताद सादर करतील बुद्ध-भीम गीतांचा सुरेल नजराना
सर्वांना नमो बुद्धाय जयभीम !!
जागतिक कीर्ति चे लोकप्रिय बौद्ध धम्मगुरु, प्रकांड पंडित, अभ्यासक, जगभरात बुब्दांचा मानवता, मैत्री आणि करुणेचा संदेश प्रसारित करणारे, बौद्ध आचार्य, अभ्यासक, विचारक, संशोधक, लेखक अजाह जयासारो दिनांक १३ जानेवारी २०२३ ला नागपुर ला येत आहे. भंते जी मुळचे इंग्लैंड चे (जन्म १९५८ मधे नाव: शान माइकल चिव्हटन) भंते जी फॉरेस्ट ट्रेडिशन अर्थात वन परंपरेतील ब्रिटिश- थाई बौद्ध भिक्खु आहेत. त्यांचा जन्म इंग्लैंड मधील आयल ऑफ वीट येथे झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी ते बुद्धांच्या विचारांनी प्रभावित झाले. त्यानंतर सलग २ वर्षे ते भारतामध्ये बुद्धांच्या शिकवणुकीचा अभ्यास करीत होते.
त्यानंतर ते थाईलैंड ला गेले आणि वाई फॉरेस्ट ट्रेडिशन मध्ये पारंगत झाले. आणि तिथेच स्थायिक झालेत. थाई फॉरेस्ट परंपरा ही फार शिस्तबद्ध आणि कठोर अशी तपस्या आहे. वाईलैंड मधील अतिशय लोकप्रिय बौद्ध धम्म गुरु म्हणून त्यांची ख्याति आहे. मानवतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याप्रति थाईलैंड सरकार त्यांना सर्वोच्च सन्मान देवून त्यांना सन्मानित केले. तसेच थायलंडचे राजा वजिरालॉगकॉर्न यांच्याकडून अनेक रॉयल पदव्या देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्वांसोबत सुसंवाद आणि मैत्री साधनारे अशी त्यांची ख्याति आहे कोरोना काळात त्यांनी भारतासह अनेक देशांना एम्बुलेंस, वेंटिलेटर्स आणि ऑक्सीजन कॉन्सट्रेटर दान दिलेत. बुद्धांची मैत्रीभावना आणि दानपारमिता यावर त्यांची व्याख्याने जगभर गाजली आहेत. भंते जी अतिशय सौजन्यशील, सुस्वभावी, मितभाषी, प्रियदर्शी आणि धम्म विजयाचे पालन करणारे आहेत. त्यांचे दर्शन है दुर्लभ आहेत.
भंतेजी, नागपुर मध्ये आपल्याला आशीर्वचन द्यायला येत आहे. तेव्हा निश्चितपणे आपण आपल्या परिवारासह या धम्म प्रवचनांचा लाभ जरूर घ्यावा ही विनंती.
आयोजक : मेत्ता ग्लोबल फाउंडेशन, मुंबई
Metta Global Foundation, Mumbai
Buddhist bharat
More Stories
OKUTTAR LOKUTTARA MAHAVIHAR लोकुत्तर महाविहार येथे एक दिवसीय विपस्सना शिबिराचे आयोजन…
02 March – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा