परभणी थायलंड देशातील आंतरराष्ट्रीय दोनशे बौद्ध भंतेजीचा सहभाग असलेली, दीक्षाभूमी नागपूर ते लेह लडाख अशी दुसरी भव्य धम्म पदयात्रा, आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाऊंडेशन द्वारा, ५ मे २०२३ पासून २३ जुलै २०२३ दरम्यान आयोजित केली आहे. अशी माहिती अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अनु. जाती विभाग डॉ. सिद्धार्थ हत्तीअबिर यांनी दिली आहे. ही धम्म पदयात्रा दीक्षाभूमी नागपूर येथून प्रारंभ होऊन राजगिर, बुद्धगया, सारनाथ धर्मशाळा, लेह लडाख येथे पोहचणार आहे. भारत भूमीतील बुद्ध धम्म हा जगात थायलंड, श्रीलंका, जपान, द.कोरिया, ब्रम्हदेश, म्यानमार, कंबोडिया आदी राष्ट्रात पोहचला आहे. डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२३, परभणी ते चैत्यभूमी (दादर) अशी थायलंड देशातील ११० बौद्ध भंतेजीचा व हजारोंच्या संख्येने धम्म बांधव, महिला पुरुष युवा वर्ग यांचा सहभाग असलेली भव्य बौद्ध धम्म पदयात्रा आयोजित केली होती. नोंदणीसाठी २५ एप्रिल पर्यंत धम्म पदयात्रा संपर्क कार्यालय शिवाजी कॉम्प्लेक्स वसमत रोड, परभणी येथे करावी. असे आवाहन आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी अमोल धाडवे यांच्याशी संपर्क साधावा. धम्म पदयात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन धम्म पदयात्रा कोअर कमिटी चे डॉ. प्रकाश डाके, डॉ. बी. टी. धूतमल, प्रा. डॉ. भिमराव डाके, डॉ. बी. टी. धूतमल, प्रा. डॉ. भिमराव शिंगाडे, भगवान जगताप, प्रा. डॉ. संजय जाधव, राजेश रणखांबे, मंचक खंदारे, पंकज खेडकर, प्रा. डॉ. सुनिल तूरुकमाने, सुधीर कांबळे, चंद्रशेखर साळवे, उत्तम गायकवाड, प्रदीप जोंधळे आदिने केले आहे.
More Stories
चीनने दलाई लामा यांच्या मृत्यूनंतर भिक्षूंना करू शकत नसलेल्या गोष्टींची यादी दिली आहे
New Zealand New Visa Rules : न्यूझीलंड सरकारने व्हिसा नियमांमध्ये मोठा बदल केला
तैवान बौद्ध संघटनेने मुख्य भूभागाला 30 कलाकृती दान केल्या