December 29, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

त्रिरश्मी बुद्धलेणी येथील पुज्य भन्ते अश्वजित(थेरो)यांच्या वर्षावासाचा 83 वा मंगलमय दिवस

त्रिरश्मी बुद्धलेणी येथील
पुज्य भन्ते अश्वजित(थेरो)यांच्या वर्षावासाचा 83 वा मंगलमय दिवस-

दिनांक 14 ऑक्टोबर 2021( गुरुवार) रोजी भिक्खू संघाला धम्मविहार,गोरक्षनगर यांच्या वतीने भोजनदान,फलाहार दान ,व आर्थिक दान,अष्टपरिस्कारदान, चिवरदान आदी.दान कर्म करून पुण्यअर्जित करण्यात आले.पुज्य भन्ते अश्वजित यानी धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त विशेष धम्मदेसना दिली.
त्यांच्या दानकर्मास भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटीच्या वतीने त्रिवार साधुकार.बुध्द धम्म व संघ प्रतापाने मंगल होवो.पुज्य भन्ते अश्वजित यानी धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त विशेष धम्मदेसना दिली.या कार्यक्रमाचे आयोजन धम्मसेवक वामन पवार गुरुजी यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. बौद्धाचार्य-मिलिंद बनसोडे गुरुजी,अनिल बागुल गुरुजी,उपासक अमोल खंदारे आदी धम्मसेवा दिली.या प्रसंगी नाशिक शहरातील विपश्यना साधक साधिका, धम्म सेवक,धम्म सेविका व बौद्ध बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
💐💐💐💐💐
दानदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व मंगल मैत्री