April 25, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

खडवली येथे “भारतीय संविधान दिन” उत्साहात साजरा..

कल्याण तालुक्यातील खडवली येथे दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी “राजगृह प्रतिष्ठान खडवली” यांच्या वतीने “भारतीय संविधान दिन” उत्साहात साजरा करण्यात आला..
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून करण्यात आली.. व संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुईक वाचन करण्यात आले..
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले..तसेच प्रमुख वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले…व राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले..
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सोमनाथ कातडे सर (आदि व्याख्याते,बहुजन चळवळ), कमलेश उबाळे साहेब ( विद्यार्थी नेते, सिद्धार्थ विधी महाविद्यालय, मुंबई), यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.. तसेच राजगृह प्रतिष्ठान चे संस्थापक विकी जाधव यांनी आपले विचार मांडले..
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुप ग्रामपंचायत बेहरे सरपंच सौ. दिपालीताई शेलार, माजी सरपंच रोहिणीताई जाधव, सदस्य शोभाताई चव्हाण,खडवलीचे पोलीस पाटील विकास (भाऊ) सोनवणे उपस्थीत होते..
कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजगृह प्रतिष्ठान चे सचिव स्वप्निल गायकवाड यांनी केले..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजगृह प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश रातांबे,आयुष जगताप, प्रशांत जाधव,अजय पवार, विजय घोडके,आशपाक शेख,बबुआ, नसीम अन्सारी, सागर लोखंडे, अजय रातांबे यांनी मेहनत घेतली..
यावेळी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी व खडवलीतील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते..