नाशिक दि.29 डिसेंबर( प्रतिनिधी ) थोर समाज सुधारक, स्री शिक्षण प्रेरणास्रोत सावित्रीमाई फुले,राजमाता जिजाऊ व महामाता रमाई या आपल्या देशाच्या सांस्कृतीक महामाता आहे . त्यांनी समस्त मानवजातीसाठी महान प्रेरणादायी कार्य केले आहे. त्यांच्या महान त्यागामुळेच आपला भारत देश घडलेला आहे. त्यामुळे त्यांचे आदर्श जिवनचरित्र व गौरवशाली कर्तुत्वाचा इतिहास पिढानपिढ्या मानवजातीला प्रेरणा व स्फूर्ती देत राहील. त्यांच्या विचारांचा समाजामध्ये प्रचार प्रसारासाठी चारिका फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम आयोजित केले जातात.
सालाबादप्रमाणे यावर्षी देखील या तिन्ही महामातांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या महान कार्याविषयी सर्वसामान्य नागरीकांना,महिलांना
,विद्यार्थ्यांना,युवकांना अवगत करण्यासाठी दिनांक. 31 डिसेंबर 2023 (वार रविवार ) रोजी पाथर्डी फाटा येथील संघमित्रा बुद्ध विहार,दामोधर नगर ,पाथर्डी फाटा येथे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे.
यामध्ये निंबंध स्पर्धा – वेळ सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत,भाषण स्पर्धा- वेळ दुपारी 12 ते 2 पर्यंत, चित्रकला स्पर्धा- वेळ दुपारी 2 ते 4 पर्यंत,रांगोळी स्पर्धा – वेळ दुपारी 4 ते 6 पर्यंत,गीत गायन स्पर्धा -वेळ सायंकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत. समावेश आहे .
सदर स्पर्धेत प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना सन्मानचिन्ह महामाता रमाई जयंतीदिनी (दिनांक 7 फेब्रुवारी) मान्यवरांच्या हस्ते दिली जातील. तसेच प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाला सहभागी प्रमाणपत्रे देवून गौरव करण्यात येईल.
तरी,या स्पर्धेमध्ये सर्वांनी अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद बनसोडे गुरुजी यांनी केले आहे.
स्पर्धेमध्ये प्रवेशासाठी संपर्क- आयु.मिलिंद बनसोडे गुरुजी (संस्थापक अध्यक्ष ) मो.9960320063
आयु.सागर रामटेके(उपाध्यक्ष ) मो.9420002935
आयु.प्रशांत त्रिभुवन(खजिनदार ) मो.9021667562
आयु.प्रमोद नरवाडे(सदस्य ) मो.8329323407
आयु.प्रविण ढिवरे(सदस्य ) मो.9325150697
आयु.राहुल बनसोडे(सदस्य ) मो.7058638069
Organization of various competitions for students on behalf of Charika Foundation
More Stories
काश्मीरचा हरवलेला बौद्ध वारसा पुनरुज्जीवित करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरने पहिले-वहिले एकत्रित पुरातत्व अभियान सुरू केले
नवीन दलाई लामा कसे निवडले जातील आणि त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल ?
महाबोधी मंदिराचे एकमेव नियंत्रण बौद्धांना देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली