व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. या सीईटी परीक्षांच्या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे.
CET Exam Registration : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. या सीईटी परीक्षांच्या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे.
त्यानुसार सोमवार (ता. १२)पर्यंत ही मुदतवाढ दिलेली असून, या वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेची नोंदणी करता येणार आहे. (CET registration deadline extended till Monday nashik news)
सीईटी सेलमार्फत सर्व सीईटी परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. साधारणतः मार्च महिन्यात या सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. जानेवारीअखेरपर्यंत परीक्षा नोंदणीची मुदत दिलेली होती. मात्र अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाण्याची संधी मिळावी, या उद्देशाने सीईटी सेलने यापूर्वी प्रथम मुदतवाढ दिलेली होती.
ही वाढीव मुदत मंगळवारी (ता. ६) संपुष्टात येत असताना दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. त्यानुसार सोमवार (ता. १२)पर्यंतच्या वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक आर्हतेनुसार विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करता येणार आहे.
…या अभ्यासक्रमांना मुदतवाढ : सोमवार (ता. १२)पर्यंत सीईटी परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ मिळालेल्या अभ्यासक्रमांमध्ये बी.एड.-एम.एड. (तीन वर्षे इंटिग्रेटेड), एम.एड., एम.पीएड., बी.एड. (जनरल व स्पेशल), बी.पी.एड. या शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
यासोबतच एमबीए, एम.आर्क., एमसीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा, हॉटेल मॅनेजमेंट शाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, बी. डिझाइन या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता होणाऱ्या सीईटी परीक्षेच्या नोंदणीसाठी ही वाढीव मुदत लागू राहील.
‘एलएलबी’साठी शनिवारपर्यंत : पदवीनंतर तीन वर्षे कालावधीच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी पहिल्या टप्प्यातील वाढीव मुदत शनिवार (ता. १०)पर्यंत आहे. पुन्हा मुदतवाढीची प्रतीक्षा न करता, सध्या मिळालेल्या वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दाखल करावे, असे आवाहन सीईटी सेलतर्फे केले आहे.
राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
पुणे – राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने विविध शिक्षणक्रमांच्या सीईटी परीक्षा घेतल्या जातील, असे सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.
सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली एमएचटी-सीईटीची परीक्षा १६ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जात असते. इयत्ता बारावी आणि पदवी अभ्यासक्रमांच्या आधारे अनुक्रमे पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते.
– बीएड.एम.एड. (तीन वर्ष) – २ मार्च
– एमएड सीईटी – २ मार्च
– एम.पी.ईडी. – ३ ते ३ मार्च
– बी.एड. (जनरल) – ४ ते ६ मार्च
– एमबीए/एमएमएस – ९ ते १० मार्च
– एमआर्च – ११ मार्च
– एम.एचएमसीटी – ११ मार्च
– एलएलबी तीन वर्ष – १२ ते १३ मार्च
– एमसीए – १४ मार्च
– एमएसटी-सीईटी – १६ ते ३० एप्रिल
– बीएससी नर्सिंग सीईटी – ५ मे
More Stories
2024-25 साठी परदेशात मास्टर्स आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या अभ्यासासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था NITCON Ltd संस्थेच्या वतीने मोफत प्रशिक्षण
रिक्त प्राध्यापक पद आरक्षित केले जाणार नाही, असे UGC चेअरपर्सन म्हणतात