November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बैलपोळावतन खटला ! महामानव : बॅरिस्टर डॅा. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेबांनी वकिलीच्या काळात पहिला खटला जिंकला तो सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांचा ! त्यांनी #देशाचे_दुश्मन या पुस्तकातून टिळकांवर खरमरीत टीका केलेली व केशवराव जेथे ( ज्यांनी त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती ) त्यानंतर भोपटकर वकिलांनी त्यावर जिल्हाधिकारी पूणे कडे तक्रार केली , त्वरित जेधे व जवळकर यांना अटक करून येरवडा जेल मध्ये कारावास सुरू झाला !
डॅा बाबासाहेब आंबेडकर धावून आले व पूढे अपिलाचे जाऊन हा खटला लढवून त्यांना निर्दोष सोडविले !
—————————————————

बैल पोळा वतन खटला हा आमच्या सख्ख्या मावशींच्या गावातील , गावाचे नाव वाघाडी ता: शिरपूर , जिल्हा : पश्चिम खानदेश ,आजचा धूळे , त्यावेळेस हा भाग होळकर स्टेट/ प्रांतातील समजला जात होता ( शिवस्वराज्याच्या काळात तो फारूखी मनसुब्यात होता याचे कारण अहद तंजौर तहद पेशावर पर्यंत साम्राज्य असलेल्या छत्रपती शिवाजी राज्यांच्या काळात खानदेश कधीच स्वराज्यात सामील झाला नव्हता , हे उल्लेखनिय ! )

गावातील बैल पोळ्याच्या वतनाच्या मानावरून गावात बाहेरून येऊन गावात स्थानापन्न झालेल्या मथुरादास रूपदास धाकड वाण्याच्या सावकारीने उन्माद मांडला होता व पोळा सणाच्या दिवशी मानपानाचे नाट्य रंगले ! चार जणांचे खून व बावीस जण गंभीर जखमी झाले होते ! वाण्याकडे अमाप संपत्ती होती त्याने मुंबईचे वकिल म्हणून बॅ पारडीवाला यांना नेमले .
मावशींचे सासरे गुलाब दिनकर चंद्रराव भैरव-पाटील यांच्याकडे ५२ गावांचे इनाम असूनही हे मात्र धनदौलत बाळगून नव्हते ! यांना वकील कोण असावा ? यासाठी त्यांनी त्यांचे भाऊ रंगराव पाटील व त्यांचे मित्र साक्री तील धाडणे गावातील नामदेवराव पाटील ( ब्राम्हणेत्तर पक्षाचे धूळे तालुक्यांतील आमदारकी चे पहिले उमेदवार) यांनी जळगावातील अच्युतराव अत्रे व शिरपूरच्या पंडीत वकील यांच्या सल्ल्याचे बॅरिस्टर वकील नेमायचे ठरले !
मग मावशींच्या सासऱ्यांनी थेट डॅा बाबासाहेबांकडे वकील होण्यासाठी विनंती केली व ती त्यांनी स्विकारलीही ! पूढे खटल्यासाठी बाबासाहेब चाळीसगाव पर्यंत रेल्वे ने आले व पूढे त्यांना धूळे येथे सासऱ्यांनी पोहच केले . आदल्या दिवशी राहायची व्यवस्था घरी करू असे ठरले होते परंतू ॲडव्होकेट तवंर यांच्याकडे थांब्यांचे निश्चित झाले परंतू बाबासाहेब एडीएम सर्किट हाऊस ला थांबले !
खटल्यात एकूण १२२ साक्षीदारांपैकी फक्त चार साक्षीदार बाबासाहेबांनी तपासले ! मुलकी प्रशासनानुसार गाव रामोशी , गाव कोळी , गाव कुंभार व गाव जमादार ! खटल्याचा निकाल मावशीच्या सासऱ्यांचा बाजूने लागला खरा परंतू बाबासाहेबांच्या फी चा प्रश्न उभा ठाकला होता
! कारण बॅ जाल पारडीवालांची फी होती रू ५०००/- रुपये ! मग घरातील दागिने विक्री करून रक्कम जमा झालेली रू ३६००/- व पूर्वीचे शिल्लक रू २००/- अशी एकूण ३८००/- रू रक्कम बाबासाहेबांना द्यायला काढली त्यातील त्यांनी मुंबई ते चाळीसगाव येण्या जाण्याचे रेल्वे भाडे रक्कम रू ६४/- घेतली व बाकीचे पैसे परत करत सांगितले की “ वकिली माझी जरी होती तरी खरी कसोटी इथून पूढे तूझी आहे ! “ आणि खरोखर तसेच घडले पूढे सासऱ्यांच्या धाकट्या मुलीच्या लग्नावर समग्र सकल मराठा नातेवाईकांनी १००% बहिष्कार टाकला ! जावई होते जालन्याचे बाळासाहेब पवार ! नंतर ते संसद सदस्य ही झाले ! परंतू कूणालाही न हिंगलता मावशीच्या सासऱ्यांनी त्याचवेळी लग्नातील भोजनाची पहिली पंगत गावातील दलितांची केली ती आजतागायत ! पूढे डॅा बाबासाहेब कायदामंत्री झाल्यानंतरच मावशींचे सासरे दिल्लीला त्यांचा सत्कार करायला ही न विसरता गेले व डॅा बाबासाहेबांनी त्यांना एक दिवस थांबवून घेतले !
गाव रामोशी , गाव कोळी व गाव कुंभार यांच्या बाबतीतले म्हणणे तर एवढे यथोचित मांडले होते बाबासाहेबांनी , परंतू लेखन मर्यादा !
ता.क. : डॅा बाबासाहेबांच्या जयंतीदिनी ही पोष्ट करणार होतो परंतू जमले नाही ! बाबासाहेब हे विचारांच्या व कर्माच्या जोरावर महामानव झाले , अशा थोर विभुतीस विनम्र अभिवादन ! 🌸