Buddhism Prayer : बौद्ध धम्म प्रार्थना – बुद्ध धम्मात एकदा धार्मिक ( बुद्ध धम्माचा ) कार्यक्रम आयोजित करायचं असल्यास आदरणीय भन्ते ( भिक्खू ) संघाला त्या कार्यक्रमा करिता आमंत्रित करण्याकरिता याचना करावी लागते, त्या महत्वपूर्ण खमा याचना, पंचसील याचना
पाली आणि मराठी भाषेत खालील प्रमाणे आहे…
🌸🌸 पाली भाषेत : खमा याचना 🌸🌸
01) खमा याचना
ओकास, वन्दामि भन्ते ।
द्वारतयेन कतं सब्बं मयं अपराधं खमतु मे भन्ते ।
दुतियम्पि ओकास वंदामि भन्ते ।
द्वारत्तयेन कत्तं सब्बं मयं अपराधं खमतु मे भन्ते ।
ततियम्पि ओकास वंदामि भन्ते ।
द्वारतयेन कर्त सब्बं मयं अपराधं खमतु मे भन्ते ।
🌸🌸 पाली भाषेत : पंचसील याचना 🌸🌸
02 ) पंचसील याचना
ओकास, अहं भन्ते ।
तिसरणेनसह पंचसील धम्मं याचामि ।
अनुग्गहं कत्वा सीलं देथमे भन्ते ।
दुतियम्पि, ओकास अहं भन्ते । तिसरणेनसह पंचसील धम्मं
याचामि अनुग्गहं कत्वा सीलं देथमे भन्ते ।
ततियम्पि, ओकास अहं भन्ते । तिसरणेनसह पंचसील धम्मं
याचामि अनुग्गहं कत्वा सीलं देथमे भन्ते ।
🌸🌸 मराठी मधून क्षमा याचना 🌸🌸
०१ ) क्षमा याचना
अवकाश द्या भन्ते मी आपणास वंदन करीत आहे. माझ्याकडून ( काया, वाचा, मनाने ) काही अपराध घडला असेल तर मला क्षमा करावी.
दुसऱ्यांदा अवकाश द्या भन्ते मी आपणास वंदन करीत आहे. माझ्याकडून ( काया, वाचा, मनाने ) काही अपराध घडला असेल तर मला क्षमा करावी।
तिसऱ्यांदा अवकाश द्या भन्ते मी आपणास वंदन करीत आहे. माझ्याकडून ( काया, वाचा, मनाने ) काही अपराध घडला असेल तर मला क्षमा करावी.
🌸🌸 मराठी मधून पंचशील याचना 🌸🌸
०२ ) पंचशील याचना
भन्ते! मला वेळ द्या. मी आपणास त्रिशरणासह पंचशील धम्माची याचना करीत आहे.
भन्ते । कृपया आपण मला शील प्रदान करावे.
दुसऱ्यांदा हे भन्ते मला वेळ द्या. मी आपणास त्रिशरणासह पंचशील धम्माची याचना करीत आहे.
भन्ते । कृपया आपण मला शील प्रदान करावे.
तिसऱ्यांदा हे भन्ते! मला वेळ द्या. मी आपणांस त्रिशरणासह पंचशील धम्माची याचना करीत आहे.
भन्ते । कृपया आपण मला शील प्रदान करावे.
More Stories
‘सम्यक वाचा’ अनुसरा आणि गोड बोला Mindful Communication is Sweet talk
परित्राण पाठ मराठी मध्ये Paritran Path in Marathi
बुद्धधम्म परिचय विद्यार्थीकरिता – भन्ते. डॉ. सी. फँनचँम