राहुल बुद्ध विहार ,राहुल नगर , वाशीनाका , मुंबईत वर्षावास कार्यक्रमाचा २८ वा दिवस होता . घराघरात बुध्द उत्सव का सुरू करायला हवा या विषयी मान. धम्म प्रचारक , सागर रामभाऊ तायडे यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले .
घराघरात बुध्द उत्सव कसा सुरू करावा व उत्सावाबद्दलची सविस्तर माहिती ज्या दैनिकामध्ये छापलेली आहे ते पश्चिम महाराष्ट्रातील दैनिक मुक्तनायक उपस्थितांना वाटण्यात आले.
व्याख्यान सुरू होण्यापुर्वि स्थानिक कृष्णाबाई ससाणे , अरूण पलघामोल यांनी बुध्द भीम गीते सादर केली .
आंबेडकरी विचार आपल्या गाण्याच्या माध्यमातून सतत लोकांपर्यंत पोहोचविणारे शाहीर कालीदास रोटे यांनीही काही वर्षावास कार्यक्रमात हजर राहून उत्साह निर्माण करणारी , छान प्रबोधन करणारी बुध्द भीम गीते गायली.
शेवटी धम्म भगिणी सिताबाई बबन शिंदे यांनी आणलेला अल्पोपहार सर्वांना वाटण्यात आला.
घराघरात बुध्द उत्सव….
More Stories
त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे बुद्धिस्ट भारत टीमकडून माता रमाई आंबेडकर जयंती साजरी, भोजनदानातून धम्मसेवा
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जंतर-मंतरवर 12 फेब्रुवारी पासून बौद्धांचा एल्गार
बौद्ध भिक्षूंनी वॉशिंग्टनमध्ये १५ आठवड्यांचा ‘वॉक फॉर पीस’ पूर्ण केला.