August 4, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

नाशिक मध्ये बुध्द स्मारक परिसरात श्रीलंकेतील बोधीवृक्षाचे रोपण होणार : भदत्न सुगत

श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधिवृक्षाच्या फांदीचे नाशिकमधील त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारक परिसरात येत्या ऑक्टोबरमध्ये रोपण केले जाणार आहे. या बोधिवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून उपासक येणार असल्याने त्यादृष्टीने सोयी-सुविधांचे सूत्रबद्ध नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.

ऑक्टोबर महिन्यात बोधिवृक्ष स्थापना महोत्सव नाशिक शहरात महिनाभर होणार आहे. या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जापान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. पुढे सम्राट अशोक यांच्या मुलांनी या वृक्षाची फांदी श्रीलंकेच्या अनुराधापूरात स्थापित केली. याच वृक्षाच्या फांदीचे रोपण नाशकात केले जाईल, असे शांतिदूत ट्रस्टचे भदत्न सुगत यांनी सांगितले.