१२ मे ! मंगल दिवस !
● आजच्याच दिवशी म्हणजे १२ मे १९६८ रोजी श्रीलंकेतील ऐतिहासिक वारसा असलेल्या धम्मस्थळ अनुराधापुरा येथील बोधीवृक्षाचे नागपूर येथील दीक्षाभूमी इथे बोधीवृक्षारोपन करण्यात आले होते.
● श्रीलंका सरकारला विनंती करून अनुराधापुरा येथील बोधीवृक्षाच्या तीन फांद्या वंदनीय भदंत डॉ. आनंद कौशल्यान, भदंत डॉ. हमपोलो रतनसारा, भदंत आनंदमंगल ह्यांनी दीक्षाभूमी नागपूर ला आणल्या होत्या.
● वंदनीय भन्ते डॉ. भदंत आनंद कौसल्यायन हे बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक व विचारवंत म्हणून जगविख्यात होते. श्रीलंकेत त्यांना मोठा मान होता. दीक्षाभूमीशी त्यांचे नाते दृढ झाल्यानंतर हा बोधिवृक्ष दीक्षाभूमीवर आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला. भदंत कौसल्यायन यांच्या विनंतीवरून श्रीलंका सरकारने संसदेत ठराव पारित केला व १९६८ साली या बोधिवृक्षाच्या फांदीला भारतात आणण्याची परवानगी मिळाली. तीन वेगवेगळे कोवळे बोधिवृक्ष कुंडीत ठेवण्यात आले. विमानाने त्यांना भारतात आणण्यात आले.
● तिन्ही वंदनीय भन्तेजींनी दीक्षाभूमी, नागपूर येथे एकाच ठिकाणी त्यांनी श्रीलंकेतून आणलेल्या फांदीचे बोधीवृक्षारोपन केले. ज्यामुळे आपल्याला आज दीक्षाभूमी येथे ते एकजीव बोधिवृक्ष दिसते.
● १२ मे १९६८ रोजी दीक्षाभूमीवर समारंभपूर्वक बोधीवृक्षारोपण झाले त्यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड होते.
● अनुराधापुरा, श्रीलंका मधील हे तेच बोधीवृक्ष आहे जे महान सम्राट अशोक यांची मुलगी संघमित्रा यांनी श्रीलंकेत गेल्यावर वृक्षारोपण केले होते आणि ह्या बोधीवृक्षाची फांदी बुध्दगया येथील विश्ववंदनिय तथागत गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या बोधीवृक्षाची होती. श्रीलंका सरकारने या बोधीवृक्षाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
● बौद्ध धम्माच्या बाबतीत हे बोधीवृक्ष हे एक ऐतिहासिक sacred relics म्हणून संबोधले जाते.
संदर्भ: दीक्षाभूमी समिती, नागपूर. आणि ईतर संकलित लेख.
__संकलन: मैत्रेय बुद्धदास, जागतिक बुध्द धम्म दिक्षा समिती.
More Stories
Dhammachakra Pravartan Din 2025 : आज साजरा केला जातोय 69 वा “धम्मचक्र प्रवर्तन दिन”; काय आहे यामागचा इतिहास ? वाचा सविस्तर
Dhamma Dhwaj Vandana धम्म ध्वज वंदना
Dr. Babasaheb Ambedkar Social Contribution डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान